Sunday, May 19, 2024
Homeग्रामीणखाजगी वित्त कंपन्यांचे एजंटकडून वसूली; आप'चे पोलीस आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

खाजगी वित्त कंपन्यांचे एजंटकडून वसूली; आप’चे पोलीस आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नागपूर : खाजगी वित्त कंपन्यांचे एजंटकडून वसूली करत असून त्याविरोधात आम आदमी पार्टी ऑटो संघटनेच्या वतीने पोलीस आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, खाजगी वित्त कंपन्यांचे एजेंट द्वारे आर.बी.आई. नियमाचे उल्लंघन करत असून पोलीस एजेंटवर कार्यवाही करण्यास नकार देत आहेत.

 कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशात लॉकडाउन झाल्याने नागपूर मध्ये ऑटो रिक्षा बंद असल्याने   ऑटो चालकांची कमाई बंद झाली होती. यामुळे ऑटो चालकांचे जीवन जगणे कठीण झाले आहे. पैसे नसल्याने  इएम्आय भरण्यात ते अपयशी ठरले आहे. खाजगी वित्तकंपन्यांचे एजेंट वसूली साठी अवैध प्रकारे गाडी जप्ती करत आहे. केंद्र सरकार द्वारे हप्ते भरण्यात अपयशी ठरणारे नागरिकांना कोणतीही कायदेशीर कार्यवाही करण्यात एक वर्षाची बंदी असताना आणि तसे  आदेश असताना हि खाजगी वित्त कंपन्यांचे १० – १२ एजेंट घरी येवून ऑटो चालकांना शिवीगाळ देत आहे आणि ऑटो जबरदस्तीने जप्त करत आहे. पोलीस स्टेशन मध्ये ऑटो चालकांना कोणतीही मदत मिळत नाही, त्यामुळे ही मागणी घेऊन निवेदन देण्यात आले.

रिजर्व बँक द्वारे हप्ता वसुलीसाठी कडक नियम बनविले आहेत आणि वसुलीसाठी एजेंट करिता  पोलीस पडताळणी, प्रशिक्षण अनिवार्य केलेले आहेत. असे कडक नियमाचे पालन खाजगी गैर बैंकिंग वित्तीय निगम करत नाही. निवेदनात नागपूरच्या सर्व पोलीस स्टेशनला खाजगी वित्त कंपन्यांचे एजेंटच्या विरुद्ध कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात यावे हि विनंती पोलीस आयुक्त यांना केलेली आहे. तसेच आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर नक्की ते हप्ते भरतील असे ही म्हटले आहे.

निवेदन देताना आम आदमी पार्टी नागपुर संयोजक कविता सिंघल, शंकर इंगोले, आम आदमी पार्टी ऑटो संघटना समन्वयक संजय अनासाने, प्रशांत निलाटकर, रोशन डोंगरे, आकाश कावले, अजय धर्मे, अब्दुल हाफिज, विवेक चापले, विनोद अलमडोहकर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय