Thursday, May 2, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडकै.सुरेश मोरे उच्च माध्यमिक विद्यालयाचा इ. १२ वीचा निकाल १०० टक्के

कै.सुरेश मोरे उच्च माध्यमिक विद्यालयाचा इ. १२ वीचा निकाल १०० टक्के

गुणवंत विद्यार्थ्यांचा माजी महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते सत्कार

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक विभागा मार्फत घेण्यात आलेल्या २०२३ या शैक्षणिक वर्षाच्या इ. १२ वीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यामध्ये जाधववाडी चिखली मधील कै. सुरेश मोरे उच्च माध्यमिक विद्यालय जाधववाडी या विद्यालयाचा इ.१२ वीचा निकाल १०० % लागला असून सर्वच्या सर्व विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत.

जाधववाडी येथे योगिराज बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून कै.सुरेश मोरे उच्च माध्यमिक विद्यालय संचालित केले जाते. संस्थेचे अध्यक्ष माजी महापौर राहुल जाधव यांनी याप्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

तसेच या परीक्षेत वसिम इक्बाल मुल्ला हा विद्यार्थी ८१.३३ % गुण मिळवून प्रथम आला. तन्वी संतोष शिंदे ७१.६७% द्वितीय, भूमिका संतोष उन्नेचा ७१% तृतीय, साक्षी बाळासाहेब जाधव ७०.३३% चतुर्थ क्रमांक, पायाल सुनील रेणुसे हिने पाचवा क्रमांक पटकवला. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीन सत्कार करण्यात आला. 

यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष  महापौर राहूल जाधव यांनी सर्व विद्यार्थ्यांचे तसेच त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे सचिव प्रताप भांबे यांनी मनोगत व्यक्त करताना सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक प्राचार्य पवार, प्राथमिकचे मुख्याध्यापक शिंदे, रांगूळे, येवले, देसाई यांचे अभिनंदन केले.

यावेळी उद्योजक कुणाल काकडे, दावडी गावचे प्रथम नागरिक संभाजी घारे, संस्थेच्या लिपिक शिल्पा खुर्पे, सूर्यवंशी सर्व पालक विद्यार्थी उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्याना राहुल जाधव यांनी पेढे भरवून त्यांचे कौतुक केले.

हे ही वाचा :

मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना उत्पन्नाची संधी; तर ग्रामपंचायतींना मिळणार तब्बल मिळणार ‘इतक्या’ लाखांचे अनुदान

Blood donation : स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला प्रतिसाद

ओबीसी आरक्षण मागणारी ‘मराठा वनवास यात्रा’ पिंपरी चिंचवड शहरात दाखल

“शासन दिव्यांगांच्या द्वारी अभियान” राज्यव्यापी अभियानाचा कसा होणार फायदा पहा !

“पर्यावरण ऱ्हासासाठी श्रीमंत देश जबाबदार!” मधुश्री व्याख्यानमालेत डॉ.सुरेश बेरी यांचे प्रतिपादन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचे लोकार्पण !

असंघटित कामगारांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरणार – सुनील शिंदे

आप च्या स्वराज यात्रेची पंढरपुरातून जोरदार सुरुवात

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय