मध्यमवर्गाचे जीवन सुसह्य झाले आहे, उच्च शिक्षणाच्या व व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत – आमदार अश्विनी जगताप
पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : दि.27 – चिंचवड विधानसभा व पिंपरी चिंचवड महापालिकेत पुन्हा भाजपची सत्ता आणण्याचा निर्धार शहर भाजप पदाधिकाऱ्यांनी यांनी केला आहे.मोदी @9 या महा जनसंपर्क अभियाना अंतर्गत मावळ लोकसभा मतदार संघात विविध कार्यक्रम राबवून नरेंद्र मोदी सरकारचे विविध ऐतिहासिक निर्णय, केंद्र राज्यसरकारच्या सामान्य जनतेला लाभदायक ठरलेल्या योजनांची माहिती चिंचवड येथील पत्रकार परिषदेत देण्यात आली.
लाभार्थी संमेलन, आंतरराष्ट्रीय योग दिन, व्यापारी संमेलन, जनसंघापासून कार्यरत जेष्ठ कार्यकर्त्यांचे मेळावे, बुद्धिजीवी, कार्पोरेट, औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांचे मेळावे, सोशल मीडिया ईई विविध मार्गाने 9 जून पासून विविध कार्यक्रम राबविण्यात आले. भाजपच्या बूथ, मंडळ समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करून एक लाख कुटुंबियांना मोदी सरकारच्या 9 वर्षातील कामकाजाची माहिती दिली आहे, अजून एक लाख कुटुंबापर्यत मावळ लोकसभा, चिंचवड विधानसभा मतदार संघात पुन्हा भाजप विजयी करण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.
मध्यमवर्गाचे जीवन सुसह्य झाले आहे
यावेळी आमदार अश्विनी जगताप यांनी सांगितले की, शहरी मध्यमवर्गाला केंद्रसरकारने आयकर उत्पन्न लाखापर्यंत करसवलत दिली, मेट्रो सुविधा 20 मोठ्या शहरात पोचली आहे.390 नवीन विद्यापीठे ,7 नवीन आयआयटी, 7 नवीन आय आय एमची स्थापना करून अति उच्च व आधुनिक शिक्षणाच्या संधी निर्माण केल्या आहेत. 15 एम्स, 225 मेडिकल कॉलेजेस या 9 वर्षात विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली आहेत. एक लाख स्टार्टअप्स, 100 हुन जास्त युनिकॉर्न मार्फत विविध आर्थिक सवलती देऊन नवउद्योजकांना संधी प्राप्त करून दिल्या आहेत. डिजिटल व्यवहारामुळे सूक्ष्म, लघु व्यावसायिकांच्या व्यवहार उलाढालीत वाढ झाली आहे. जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था अधिक गतिमान करण्यासाठी देशात पुन्हा मोदी सरकार येणार आहे, असे आमदार अश्विनी जगताप यांनी सांगितले.
जनतेच्या सहभागातून संपर्क अभियान यशस्वी होत आहे.
भाजपचे प्रदेश सदस्य व वरिष्ठ नेते शंकर जगताप यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, मावळ लोकसभा मतदार संघात कोण उमेदवार असेल किंवा कोणाला पाठिंबा द्यायचा हे पक्ष ठरवेल. हे जनसंपर्क अभियान देशातील सर्व लोकसभा मतदार संघात सुरू आहे. आम्ही सर्व पदाधिकारी व बूथ कमिटीचे शिस्तबद्ध कार्यकर्ते जनतेला सहभागी करून मोदी सरकारच्या यशस्वी कारकिर्दीची माहिती घरोघरी देत आहोत. विविध कार्यक्रमातून जनतेशी थेट संवाद साधत आहोत,त्यामुळे 2024 मध्ये पुन्हा भाजपची सत्ता येणार आहे. असे लक्ष्मण जगताप यांनी ठामपणे सांगितले.
यावेळी माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, संतोष कलाटे, युवा मोर्चा अध्यक्ष संकेत चोंधे, महिला अध्यक्षा उज्वला गावडे, शत्रुघ्न काटे, संदीप कस्पटे, शशिकांत कदम, सिद्धेश्वर बारणे, राजेंद्र चिंचवडे, विनोद तापकीर, योगेश चिंचवडे आदी प्रमुख पत्रकार परिषदेस उपस्थित होते. मोदी@9 चे संयोजक, जिल्हा सरचिटणीस ऍड.मोरेश्वर शेडगे यांनी प्रास्ताविक केले, मोदी@9 कार्यक्रमाचे माजी नगरसेवक शत्रुघ्न काटेयांनी आभार व्यक्त केले.
हे ही वाचा :
महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत 10वी ते पदव्युत्तर पदवीधरांना नोकरीची संधी
सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत रिक्त पदाची भरती, आजच अर्ज करा
NATS : नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम अंतर्गत 750 पदांची भरती
IPPB : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत विविध पदांची भरती