Sunday, April 28, 2024
HomeNewsमेदनकरवाडी ग्रामपंचायत उपसरपंच मंगल मेदनकर बिनविरोध

मेदनकरवाडी ग्रामपंचायत उपसरपंच मंगल मेदनकर बिनविरोध

आळंदी / अर्जुन मेदनकर : येथील मेदनकरवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मंगल शामराव मेदनकर यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती सरपंच अमोल साळवी यांनी दिली. या निवडी प्रसंगी सरपंच अमोल साळवी, माजी उपसरपंच संभाजी मेदनकर, महेंद्र मेदनकर, गणेश भुजबळ, संकेत मेदनकर, संजय वाघमारे, निलम मेदनकर, श्रीमती सिंधूताई मेदनकर, पल्लवी भुजबळ, सलोनी मेदनकर, स्वाती गवते, सुमनताई खरात विद्यमान ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

मेदनकरवाडी उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल माजी सरपंच नंदाराम भुजबळ, नवनाथ भुजबळ, माजी सरपंच उत्तम आगरकर, दत्तात्रय चौधरी, शिवाजी मेदनकर, माजी उपसरपंच जगदीश मेदनकर, सुभाष भुजबळ, संदीप मेदनकर, अमित मेदनकर, अविनाश मेदनकर यांनी नवनिर्वाचित उपसरपंच मंगल मेदनकर यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रामविस्तार अधिकारी सुदाम कड यांनी आभार मानले.

Lic

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय