Friday, March 29, 2024
Homeनोकरीपोलिस भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ

पोलिस भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ

मुंबई : राज्यातील पोलीस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला असून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, पोलीस भरतीसाठी आतापर्यंत आमच्याकडे ११ लाख ८० हजार अर्ज आले आहेत. मात्र, पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना अर्ज करताना अनेक अडचणी येत असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या असल्याने आता पोलीस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी १५ दिवसांची मुदत वाढवण्यात आली असल्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला असून पोलीस भरतीसाठी ऑनलाइन अर्ज भरताना आलेल्या सर्व अडचणी दूर करण्यात येत असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे मागील काही दिवसांपासून पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी मुदत वाढवण्यासाठीची करण्या येणारी मागणी राज्य सरकारने मान्य केल्याने आता पोलीस भरतीसाठी इच्छुक असणाऱ्यांना आता १५ डिसेंबर २०२२ पर्यंत आपले अर्ज भरता येणार आहेत.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा whatsapp ग्रुप ला join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic

Lic
संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय