Sharad Pawar Manifesto : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने २०२४ च्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्याला ‘शपथनामा’ असं नाव देण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. शरदचंद्र पवार पक्षाच्या (Sharad Pawar Manifesto) या शपथनाम्यातून नागरिकांना अनेक आश्वासने देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात घरगुती वापराचा गॅस, शासकीय नोकऱ्या आणि महिलांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण या संदर्भात काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. समाजातील सर्व घटकांचा, शेतकऱ्यांचा, तरुणांचा, महिलांचा विचार या जाहीरनाम्यात करण्यात आला आहे. तसेच आमची सत्ता आल्यास ५० % आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी कायदा करू असे आश्वासनही शरद पवार गटाने दिल आहे.
जाहीर नाम्यातील घोषणा (Sharad Pawar Manifesto) :
- स्वयंपाकाच्या गॅसची किंमत ५०० रुपये निश्चित करणार.
- पेट्रोल आणि डिझेलच्या किमती नियंत्रणात ठेवणार.
- इंधन दरासंबंधी राज्य व केंद्र सरकार यांच्यातील रचनेचा फेरविचार करण्यासाठी समिती नियुक्त करणार.
- राज्य सरकारच्या हक्क आणि अधिकारात केंद्राची ढवळाढवळ होण्याची शक्यता असणारे घटनेतील कलम ३५६ रद्द करणार.
- राज्यपालांची नियुक्ती संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करूनच व्हावी, अशी पद्धत आणणार.
- दर पाच वर्षांनी जातनिहाय जनगणना करणार.
- देशातील सर्वात मोठा अल्पसंख्याक गट असलेल्या मुस्लिम समाजाला प्रगतीच्या संधी
- उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ‘सच्चर आयोगा ’च्या शिफारशींची अंमलबजावणी करणार.
- जेष्ठ नागरिकांसाठी आयोगाची स्थापना करू
- आरोग्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद 4 टक्क्यांपर्यंत करू
- शिक्षणासाठी अर्थसंकल्पीय तरतूद 6 टक्क्यांपर्यंत करू
- शेती आणि शैक्षणिक वस्तूंवर शून्य टक्के जीएसटी असणार
- खाजगीकरण आम्ही मर्यादा आणू
- अग्निवीर योजना आम्ही बंद करू
- वन नेशन आणि वन इलेक्शन चर्चा करणे आता योग्य नाही, आधी आहेत त्या इलेक्शन यंत्रणा सक्षम करू
- प्रत्येक गरीब महिलेला वार्षिक 1 लाख देऊ
- अंगणवाडी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवू
हे ही वाचा :
धक्कादायक : बनावट चेक, सह्यांचा वापर करून शिक्षण विभागाचे ४७ लाख रुपये लंपास
रिझर्व्ह बँकेचे पुन्हा एका बॅंकेवर निर्बंध; तुमची तर बँक नाही ना?
व्हिडिओ : भाषण सुरू असतानाच नितीन गडकरींना भोवळ
ब्रेकिंग : चीनमध्ये भीषण महापूर, 100,000 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी
नाशिक येथे पदवीधर व डिप्लोमा उत्तीर्णांसाठी अप्रेंटिस ची मोठी संधी
ब्रेकिंग : APMC शौचालय घोटाळा प्रकरणी संजय पानसरेंना अटक, सात कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
सोन्याच्या दर मोठी घसरण; जाणून घ्या नवीन दर
मनोज जरांगे पाटलांवरील चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात