Friday, November 22, 2024
Homeलाइफस्टाइलघरोघरी मालवणी आणि कोल्हापुरी, झणझणीत मटण मासळीवर लोक मारताहेत ताव

घरोघरी मालवणी आणि कोल्हापुरी, झणझणीत मटण मासळीवर लोक मारताहेत ताव

थोडीशी दरवाढ तरीही मांसाहाराकडे कल वाढला 

पिंपरी चिंचवड : शहरातील विविध फिश मॉल, मटण, चिकन दुकानापुढे ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. “एव्हरी डे इज नॉट ए संडे फॉर फिश ओनली’अशी एक म्हण आहे. कोकणातील बहुसंख्य लोक माशे खातात. त्यांच्या तब्येती आजाराला पळवून लावतात. कोरोनाच्या काळात गेली दोन वर्षे कोकणी, मालवणी, कोल्हापुरी झणझणीत रेसिपी गृहिणी मध्ये लोकप्रिय झाल्या आहेत. साथीच्या रोगाच्या भीतीने आता हॉटेलमध्ये जाणाऱ्या कुटुंबांचे प्रमाण खूप कमी झालेले आहे.

कसदार, चटकदार मासे, मटण, चिकन रेसिपीचे स्वाद रविवार,बुधवार, शुक्रवार या दिवशी सर्वत्र दरवळू लागले आहेत. कडाक्याच्या थंडीत मांसाहारी थाळी मध्ये वरळी कोळीवाडा, ठाणे, विरार, वसई या मोठ्या समुद्र किनाऱ्यावरील समुद्राची मासळीचा पिंपरी चिंचवड शहरात घरगुती खप वाढू लागला आहे. अतिशय चवदार बांगडे मालवणी रस्सा आणि फ्रायसाठी ग्राहकप्रिय ठरत आहेत. लहान मध्यम आकाराचे समुद्री माशे लोक खरेदी करत आहेत. 

केळी खाण्याचे फायदे व तोटे जाणून घ्या !

आम्ही सोलापूरी पद्धतीने मटण बनवतो. अलीकडे दोन वर्षात कोल्हापूरी तांबडा, पांढरा रस्सा आणि सुक्क मटण बनवायला शिकले. धना पावडर, लालमिर्ची, काळेमिरी, सुक्के खोबरे ई वाटण प्रमाणात करून घरगुती कोल्हापुरी आवडायला लागले. झणझणीत असल्यामुळे थंडीच्या दिवसात कसदार जेवण होते.

– शेहनाज शेख, बिजलीनगर

   चिंचवडगाव

चला तर समजून घेऊ – मासिक पाळी

कोल्हापुरी पांढरा तांबडा रस्सा ओरपण्यासाठी विविध ओरिजिनल मसाले ओले सुके खोबरे, दगड फुल, तमालपत्रे, कांदा, ओल्या मिरच्या, कोथिंबीर, आलं लसूण ची पेस्ट आता गृहिणीच्या फ्रीज मध्ये तयार करून ठेवलेली असते. एकाग्रचित्तानी नॉनव्हेज दिवशी नेहमीच्या आधी एक तास कुटुंबातील सदस्य नॉनव्हेज इव्हेंट साजरा करत आहेत.  नोकरदार उरलेला रस्सा गरम करून कामाच्या ठिकाणी घेऊन जातात.

रोज रोज वरण, भेंडी, वांगी कंटाळा आला

बाजारात गेल्या वर्षीच्या तुलनेत समुद्री मासळी 10 ते 20 टक्क्याने महाग झाली तरी ग्राहक शहरातील फिश मॉल, दुकाने येथे गर्दी करताना दिसत आहेत. निगडी, चिखली, चिंचवडगाव, काळभोरनगर, आकुर्डी, प्राधिकरण काळेवाडी, पिंपळे सौदागर, राहटणीभोसरी कसारवाडी ई ठिकाणी होलसेल दुकाने आणि फिश मॉल आहेत.

नवजात मुलासाठी आईने प्राण दिल्याच्या व्हायरल पोस्टचे वाचा सत्य !

कोल्हापूर मसाल्याची खासियत असते. टिपिकल निवडक मसाल्यामध्ये अस्सल चव आणि सत्त्व असते. त्यामुळे गृहिणीमध्ये त्याची लोकप्रियता वाढलेली आहे.

– मिलिंद हेर्लेकर, चिंचवडगाव

गुंतवणूकदारांसाठी खुशखबर ! पोस्ट ऑफीसात अवघ्या १०० रुपयांत आरडी सुरु करा आणि मिळवा आकर्षक परतावा

घाऊक 190 ते 260 रु किलोने एका किलो मध्ये 12 बांगडे विकत घ्यायला परवडतात बंगड्याचा खप वाढला आहे. सुरमई, रावस, पापलेट, तारली, मांदेली, बोंबील, कोकारी पापलेट, मोड्यूसा, रावस, शिंपला, समुद्री खेकडे तरुणाईमध्ये जास्त खाल्ले जातात. मालवणी, रत्नागिरी रेसिपी एकमेकांच्या ओळखीने केली जाते. मोठमोठ्या गृहसंकुलामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, मालवण, चिपळूण, दापोली सह विदर्भ, मराठवाडा येथील कुटुंबे एकमेकांना फिश फॉर व्हिटॅमिन्सचे फिटनेसचे सल्ले देऊन ताव मारत आहेत. 

यू ट्यूबवर मालवणी, कोल्हापुरी रेसिपी रेसिपी गृहिणी मध्ये प्रचंड लोकप्रिय होत आहेत. घरगूती तुझ्या माझ्या रेसिपी शेअर केल्या जात आहेत. खाडीची मासळीचे दर बदलत असले तरी ग्राहकांना परवडत आहेत. 

केंद्र सरकारच्या खर्च विभागाच्या 590 जागा, आजच अर्ज करा!

आम्ही पिंपरी चिंचवड कर आता खादीची मासळी थाळीत खाऊ लागलो आहोत, यामध्ये व्हिटॅमिन्स, प्रोटिन्स जास्त आहेत. मालवणी चवदार रेसिपी सुट्टीच्या दिवशी करतो. कोकणातील कुटुंबाकडून वाटण कसं बनवायचे ते शिकले. बांगडा, सुरमई, रावस, मोठेप्रॉन्स, पॉपलेट यामध्ये काटे कमी असतात. फ्राय आणि मध्यम करी बनवताना ओल्या नारळाची आगळी चव येते.

– सोनाली मन्हास, रुपीनगर

   तळवडे 

ग्राहकांसाठी खुशखबर : आता एकदाच करा मोबाईल रिचार्ज अगदी अल्पदरात, ६ महिने ‘नो टेन्शन’

किलोचे दर : बांगडा – लहान -180, बांगडा मोठा – 200-250, हलवा- 500-590, सौंदाळे -190-280, खापी – 200-300, सुरमई – 600-750, ओले बोंबील – 200-280, कोळंबी- लहान – 180-290, तिसऱ्या-240-270, मांदेली-120-140 तर पॉपलेट 1000-1200 ई समुद्राच्या खोल पाण्यातील मासळीचा ग्राहक वाढत आहे.

कोल्हापुरी तांबडा, पांढरा रस्सा आणि सुक्क मटणसाठी रविवारी, बुधवारी जास्त खाल्ले जाते. मटण-बोकडाचे – 680 बोलाईचे – 680, खिमा – 650, कलेजी – 700 रुपये किलोच्या दराने विक्री होत आहे.

आयटीआय पास झालेल्यांना संरक्षण खात्यात सुवर्णसंधी !

चिकनमधील ब्रॉयलर बारामती, सगुणा, गावरानचा खप वाढत आहे. चिकन 180 – 200 , लेगपीस – 230 – 250, जिवंत कोंबडी – 150, गावरान 250-350 बोनलेस -3 00 असे किलोचे दर आहेत.

– क्रांतिकुमार कडुलकर


संबंधित लेख

लोकप्रिय