नाशिक प्रतिनिधी: शेतकऱ्याचे पिवळे सोने समजले जाणारे मक्का प्रथमच लासलगाव शहरातून रेल्वेने मुंबई ला रवाना करण्यात आला.लासलगाव हे कांदाचे माहेर घर समजले जाते. परंतु कांदाचे भाव कमी झाल्याने कांदा शेतकरी मात्र चिंतेत दिसून येत होता. परंतु लासलगाव मक्का शेतकऱ्याचे अच्छे दिन आलेत असे म्हणायला हरकत नाही.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे मक्का व्यापारी सचिनकुमार यांनी खरेदी केलेल्या मक्काचे पहिल्यांदाच रेल्वेने निर्यात केली आहे.मक्काला आता चांगला भाव मिळत आहे. १३५० रुपये ते १५०० रुपये पर्यत मक्का ला भाव मिळत आहे.तर सरकारची खरेदी १८३० रुपये आहे.चांगला माल आणि खराब माल यांच्यात फक्त २५० रुपयाचा फरक आहे. असे लासलगाव बाजार समितीचे व्यापारी सचिनकुमार यांनी सांगितले.
लासलगाव रेल्वे स्टेशन वरून प्रथमच मक्का पाठवला जात आहे.त्यामुळे रेल्वे विभागाला सुमारे ५ लाख रुपयांचे उपन्न मिळणार.
– निलेश उपाध्ये (लासलगाव रेल्वे एजेंट)