Sunday, May 19, 2024
Homeकृषीराज्य सरकारला कामगारांचा रोष हवा आहे का ? - कामगार नेते अजित...

राज्य सरकारला कामगारांचा रोष हवा आहे का ? – कामगार नेते अजित अभ्यंकर

पुणे : राज्य सरकारला कामगारांचा रोष हवा आहे का ? असा सवाल कामगार नेते अजित अभ्यंकर यांनी सरकारला केला आहे. पिंपरी चिंचवड येथील आंदोलनानंतर पोलिसांनी कामगारांवर गुन्हे दाखल केल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

देशातील कामगार व शेतकरी संघटनांनी 26 नोव्हेंबर रोजी देशव्यापी आंदोलन पुकारले होते. या दिवशी पिंपरी चिंचवड येथील आंबेडकर चौकात कामगारांना मानवी साखळी करत सरकारचा निषेध केला होता. पिंपरी चिंचवड पोलिसांनी संचारबंदींंचे उल्लंघन केल्याचे कारण देत कामगार नेते अजित अभ्यंकर, कैलास महादेव कदम, मारुती भापकर, संदीप भेगडे, इरफान सय्यद, केशव घोळवे, किशोर ढोकळे, दिलीप पवार, अनिल माधवराव रोहम यांच्यासह इतर जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अजित अभ्यंकर म्हणाले की,  राष्ट्रीय संपामध्ये पिंपरी येथे २६ नोव्हेबर रोजी केलेले आंदोलन शांतता पूर्ण होते. हजारो कामगारांनी मोदी सरकारच्या कामगार विरोधी कायद्याच्या निषेधार्थ हे आंदोलन देशभर केले आहे. पिंपरी येथे कोणताही अनुचित किंवा हिंसक प्रकार घडलेला नाही. पोलीस प्रशासनाशी कोणताही संघर्ष झालेला नाही. मात्र, पिंपरी पोलिसांनी कामगार पुढाऱ्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत. महाराष्ट्र सरकार कामगार विरोधी आहे काय? महाराष्ट्र सरकारला कामगार वर्गाचा रोष नको असेल तर हे सर्व गुन्हे मागे घ्यावेत. आमची कामगार चळवळ सुरुच ठेवणार असल्याचे ही ते म्हणाले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय