Saturday, October 5, 2024
HomeकृषीRefined oil : खाद्यतेल महाग झाले, आयात शुल्कात 20 टक्के वाढ, शेतकरी...

Refined oil : खाद्यतेल महाग झाले, आयात शुल्कात 20 टक्के वाढ, शेतकरी खुश

नवी दिल्ली : देशात तेलबियांच्या किंमती फार मोठ्या प्रमाणात घसरलेले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. सरकारने असा निर्णय घेतला आहे की, शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये आणि उत्पादन खर्चापेक्षा त्यांना थोडासा भाव मिळावा, यासाठी खाद्यतेलारील आयात शुल्क सरकारने 5.5 वरून 20% पर्यंत वाढवलेले आहे. (Refined oil)

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सोयाबीन, सूर्यफूल, पामोलिन या प्रमुख खाद्यतेलाच्या आयात ड्युटीवर 32 टक्के वाढ केलेली आहे.

सरकारच्या निर्णयामुळे तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, सुरुवातीपासूनच आयात शुल्क कमी करा, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. आयात शुल्क 5.5% असल्यामुळे परदेशातून खाद्यतेलाची आयात मोठ्या प्रमाणात होत होते आणि त्यामुळे तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांचे फार नुकसान होत होते.

सामान्य ग्राहकाच्या खिशाला कात्रे

ऐन सणासुदीच्या काळात सरकारच्या या निर्णयामुळे खुल्या बाजारांमध्ये तेलाच्या किमती 16 ते 25 रुपयापर्यंत वाढलेले आहेत. याचा परिणाम म्हणून खुल्या बाजारात सोयाबीन तेलाची किमत 110 रुपये प्रति किलो वरून 130 रुपये प्रति किलो, शेंगदाणा तेलाची किंमत 175 रुपये प्रति किलो वरून 185 रुपये प्रति किलो अन सूर्यफूल तेलाची किंमत 115 रुपयांवरून 130 रुपये प्रति किलो एवढी वाढली आहे. (Refined oil)

भारत हा मोठा खाद्यतेल आयात करणारा देश आहे, देशांतर्गत मागणी मोठी असल्यामुळे सरकारला 70 टक्के खाद्यतेल आयात करावे लागते. इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडमधून पाम तेल खरेदी केले जाते, तर अर्जेंटिना, ब्राझील, रशिया आणि युक्रेनमधून सोयाबिन तेल आणि सूर्यफूल तेलाची आयात केली जाते.

भारतातील खाद्यतेलाच्या आयातीमध्ये 50 टक्क्यांहून अधिक पाम तेलाचा समावेश आहे, तेलबिया उत्पादक (सोयाबीन, शेंगदाणे, सूर्यफूल) शेतकऱ्यांना मागील काही वर्षात हमी भाव न मिळाल्यामुळे शेतकरी नाराज होते. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन, सूर्य, शेंगदाणे या पिकाला यावेळी चांगला भाव मिळेल, मात्र सामान्य ग्राहकाला महागाईचा झटका बसणार आहे.

कसे आहेत दर (प्रतिकिलो)

सोयाबीन – आधी 105. आता 126

पामतेल – आधी 104.. आता 127

शेंगदाणा – आधी198. आता 210

सूर्यफूल – आधी 102.. आता 127

आयात शुल्कवाढीचा पुढील आठवड्यात पाम तेलाच्या किमतींवर नकारात्मक परिणाम होणार हे उघड आहे. अचानक खाद्य तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने सामान्य नागरिकांना याची झळ बसणार आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

संतापजनक : चौथीत शिकणाऱ्या तीन मुलींचा शिक्षकाकडून विनयभंग

ड्रायव्हींग लायसन्सच्या ‘स्मार्ट कार्ड’ रूपांतरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत

धक्कादायक : एसी दुरुस्त करताना स्फोट; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती

ब्रेकिंग : मलायकाच्या वडिलांची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

शेतात काम करताना विद्युत तारेचा स्पर्श, चार शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

JCI : ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती

संबंधित लेख

लोकप्रिय