Thursday, November 21, 2024
Homeजिल्हाहमीभावासाठी शेकापच्या खटाऱ्याला मत देऊन, बेईमानी करणाऱ्यांना धडा शिकवा – ॲड नारायण...

हमीभावासाठी शेकापच्या खटाऱ्याला मत देऊन, बेईमानी करणाऱ्यांना धडा शिकवा – ॲड नारायण गोले पाटील

Majalgaon: शेतकऱ्याची शेतमालाला हमीभाव मिळवण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचा खटारा विधानसभेत पाठवून, माजलगाव मतदार संघात गेल्या पाच वर्षात शेतकऱ्या सह नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यात अपयशी ठरणाऱ्या आणि जनतेशी,जनतेच्या मताशी गद्दारी करणाऱ्यांना माजलगाव विधानसभा निवडणुकीत धडा शिकवा असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे विधानसभेचे उमेदवार ॲड नारायण गोले पाटील यांनी सरवर पिंपळगाव, सोमठाणा, अडोळा येथे प्रचार दौऱ्यात बोलताना केले.

गतवेळी विधानसभा निवडणुकीत माजलगाव मतदार संघातील शेतकरी, कष्टकरी, अल्पसंख्यांक, दलित, मुस्लिम समाजाने पुरोगामी विचाराचे उमेदवार म्हणून ज्यांना मते दिली त्याच लोकांनी जनतेच्या मताशी गद्दारी करत पहाटे शपथविधीला उपस्थिती दर्शवली तसेच अजित पवार यांच्यासह भाजपसोबत घरोबा करून पुरोगामी विचाराशी आणि जनतेच्या मताशी गद्दारी केली. याशिवाय पाच वर्षात तालुक्यात माजलगाव मतदार संघात शेतकऱ्यांसह, कामगारांच्या, तरुणांच्या, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर उदासीनता दाखवत शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या भाजपला बळ दिले. त्यामुळे जनतेशी गद्दारी करणाऱ्यांना या निवडणुकीत त्यांची जागा दाखवा. याशिवाय जाती-जातीत भांडणे लावणाऱ्या आणि महागाई वाढवुन देशोधडीला लावणाऱ्या व शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित किफायतशीर हमीभाव न देणाऱ्या, मराठा समाजा सह धनगर समाजाला आरक्षण नाकारणाऱ्या सरकारला घरचा रस्ता दाखवण्यासाठी शेतकऱ्याच्या कुटुंबातील कार्यकर्ता म्हणून शेतकरी कामगार पक्षाच्या खटारा चिन्हावर मत देऊन विजयी करण्याचे आवाहन ॲड.नारायण गोले पाटील यांनी केले.

यावेळी मुंजा पांचाळ, लक्ष्मण आप्पा चव्हाण, राहुल सोळंके, श्रीराम शेवाळे, जनार्दन कुदळे, भास्कर कांबळे, यांच्यासह सरवर पिंपळगाव, सोमठाणा, अडोळा शेकडो नागरिकांची उपस्थिती होती.

Majalgaon

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून भाजप सोडण्याचा निर्णय; माजी मंत्र्याचे खळबळजनक विधान

सलमान खानला पुन्हा धमकी? केली ‘इतक्या’ कोटींची मागणी

देशभरात ‘इमर्जन्सी’ लागणार, महत्वाची माहिती समोर

नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात सर्वात मोठा बदल

पुण्यात बड्या व्यावसायिकांच्या घरावर ईडीचा छापा; 85 कोटींची मालमत्ता जप्त

मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण? शरद पवारांनी केलं मोठं वक्तव्य

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटप निश्चित; कोणत्या पक्षाला किती जागा?

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकार कडून ‘रिपोर्ट कार्ड’ प्रकाशित

हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत भरती

ONGC Bharti : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध जागांसाठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय