Thursday, November 21, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडMAHESH LANDGE : महिलांच्या सुरक्षिततेची हमी म्हणून; आमदार महेश लांडगेंची ‘हॅट्रिक’!

MAHESH LANDGE : महिलांच्या सुरक्षिततेची हमी म्हणून; आमदार महेश लांडगेंची ‘हॅट्रिक’!

इंद्रायणीनगर मधील माता- महिलांचा विश्वास (MAHESH LANDGE)

प्राधिकरण प्रॉपर्टी फ्री होल्डचा निर्णय लोकहिताचा

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – इंद्रायणीनगर परिसरातील सर्व सेक्टरमधील मालमतांची मालकी पुणे महानगर विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) होती. या सर्व मालमत्ता फ्री होल्ड करण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी मोठा पाठपुरावा केला. अधिवेशनात लक्षवेधी मांडली आणि मालमत्ता फ्री होल्ड करून घेतल्या. त्याबाबतचा शासन निर्णय देखील आणला. आम्ही स्वतःच्या घराचे मालक झालो. त्यामुळे आम्ही आमदार लांडगे यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून त्यांची विजयाची हॅट्ट्रिक होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असल्याचा विश्वास महिलांनी व्यक्त केला. (MAHESH LANDGE)

भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी- आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार महेश लांडगे यांनी प्रभाग क्रमांक 8 मधील नागरिकांच्या आपुलकीच्या गाठीभेटी घेतल्या. सेक्टर 13 पासून गाठीभेटींना सुरुवात झाली. राजमाता जिजाऊ, सारा, स्पाईन चौकात आमदार लांडगे यांचे भव्य स्वागत करण्यात आले. सेक्टर 11, 9, 6, 4, 3, 7, 2, 1 या परिसरातील नागरिकांच्या भेटी घेतल्या.

ठिकठिकाणी महिलांनी आमदार लांडगे यांचे औक्षण केले. महिला, युवक, युवती, जेष्ठ सर्वांनी मोठ्या उत्साहाने आमदार लांडगे यांचे स्वागत केले. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी, माजी नगरसेविका नम्रता लोंढे, प्रतापमामा मोहिते, योगेश लांडगे, शिवराज लांडगे, योगेश लोंढे, हनुमंत लांडगे, निखिल काळकुटे, कुंदन काळे, पंकज पवार, बाबुराव लोंढे यांच्यासह ग्रामस्थ महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते फेरीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (MAHESH LANDGE)

फ्री होल्डच्या निर्णयामुळे मिळकतधारकांना दिलासा…

प्राधिकरण मालमत्ता फ्री होल्ड करण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. फ्री होल्ड करण्यासाठी एकाही पुढाऱ्याने पुढाकार घेतला नाही. आमदार महेश लांडगे यांनी यात लक्ष घातले, सातत्याने पाठपुरावा केला. विधानसभेच्या सभागृहात आक्रमकपणे हा प्रश्न मांडला आणि सरकारला मालमत्ता फ्री होल्ड करण्याचा निर्णय घेण्यास भाग पाडले. पाठपुरावा करून शासन निर्णयही आणला.त्यामुळे या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

विकासकामांच्या जोरावर विजय निश्चित…

जिल्हा न्यायालय, पोलीस आयुक्तालय प्रभागाच्या लगत होत आहे. उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालय प्रभागातच आहे. देशातील पहिले संविधान भवन सेक्टर 11 मध्ये साकारत आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्केटिंग मैदान आमदार लांडगे यांच्या माध्यमातून विकसित झाले. आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र या भागातच आहे. विविध शासकीय कार्यालयामुळे हा भाग शहराचा मुख्य परिसर म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. महिलांच्या सुरक्षिततेची काळजी आमदार महेश लांडगे घेतात. त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून महेश लांडगे यांची विजयाची हॅट्ट्रिक ही होणार हे निश्चित आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

छगन भुजबळांना मुख्यमंत्री न करण्यामागचं शरद पवारांचं धक्कादायक स्पष्टीकरण

धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल; लाडकी बहिण योजनेवर वादग्रस्त वक्तव्य

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या हस्ते भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन जाहीर

नताशा स्टँकोविक हिचा हार्दिक पांड्यासोबतच्या नात्याविषयी नवा खुलासा

शरद पवार गटाचे उमेदवार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; विवस्त्र करून अश्लील व्हिडीओ शूट

गुन्हेगारी संपवू ,बेरोजगारी संपवू, विकासाचे सर्व प्रश्न हाताळू – रोहित पवार

मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य

धक्कादायक : सांगलीत कुऱ्हाडीने वार करून भाजप नेत्याची निर्घृण हत्या

अकोल्यातील सभेत पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; गरिबांना पक्के घर देणार

महायुतीचे सरकार येताच पहिले काम ‘हे’ करणार? नरेंद्र मोदींची घोषणा

फॉर्म भरुनही पैसे आले नाही ; महत्वाची माहिती समोर

संबंधित लेख

लोकप्रिय