Friday, April 26, 2024
Homeजिल्हामहेश लांडगे यांना राज्यमंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता ! 

महेश लांडगे यांना राज्यमंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता ! 

क्रीडा किंवा नगर विकास मंत्रालय मिळू शकते!

पिंपरी चिंचवड : भाजपचे  पिंपरी चिंचवड शहरात  संघटन बळकट करण्यात आमदार महेश लांडगे यांचा मोठा वाटा आहे. शिरूर लोकसभा आणि भोसरी विधानसभा मतदार संघातील ग्रामीण, शहरी भागात नागरी सुविधा, प्रवासी, परिवहन सेवेचा विस्तार करण्यात मागील पंचवार्षिक मध्ये त्यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. भाजपला पिंपरी शहरात निर्विवाद सत्ताधारी करण्यात त्यांचे संघटनात्मक योगदान आणि प्रसिद्धी तंत्र उल्लेखनीय आहे.

आमदार लांडगे हे फडणवीसांचे विश्वासू सहकारी आहेत. आमदार जगताप आजारी आहेत. मावळमध्ये भाजपचा आमदार नाही. त्यामुळे आमदार लांडगेंना मंत्रीपद देताना कोणतीही विशेष अडचण येणार नाही. मागील दोन दशकात औद्योगिक नगरीला मंत्रिपद मिळालेले नाही.

2017 मध्ये महापालिकेत भाजपची सत्ता आली, स्मार्ट सिटीच्या नियोजनामध्ये येथील भाजपने मोठे प्रकल्प हाती घेऊन पूर्णत्वास नेले. समाविष्ट गावातील भोसरी विधानसभा मतदारसंघ एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. 

2014 आणि 2019 मध्ये आमदार महेश लांडगे यांनी येथून विजय मिळवला आहे. दांडगा लोकसंपर्क आणि प्रत्येक प्रभागातील भाजपच्या जनसंपर्क कार्यालयामार्फत महेश लांडगे यांची फिडबॅक आणि फिड फॉरवर्ड यंत्रणा कार्पोरेट मॅनेजमेंटच्या दर्जाची आहे. येत्या मनपा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचे आवाहन आहे. शहरात शंभर भाजपचे नगरसेवक निवडून आणण्याचा विडा उचललेल्या आमदार महेश लांडगे यांना क्रीडा, शहर विकास मंत्रालय त्यांना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

– क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय