Sunday, May 12, 2024
Homeआरोग्यकोरोनाअबब! राज्यात आज कोरोना बाधितांची वाढली 'एवढी' संख्या

अबब! राज्यात आज कोरोना बाधितांची वाढली ‘एवढी’ संख्या

मुंबई  : – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत नसतानाच केंद्र सरकारने अनलॉक 3.0 ची घोषणा केली. परंतु आज राज्यात ११ हजार १४७ नवीन कोरोना बाधित आढळले आहे.

राज्यात कोरोनाचे आज ८ हजार ८६० रुग्ण बरे होऊन घरे गेले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ४८ हजार ६१५ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६०.३७ टक्के आहे. सध्या राज्यात १ लाख ४८  हजार १५०  रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २० लाख ७० हजार १२८ नमुन्यांपैकी ४ लाख ११ हजार ७९८ नमुने पॉझिटिव्ह (१९.८९ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ४ हजार १४१ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४० हजार ५४६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २६६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५८ टक्के एवढा आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय