Sunday, April 28, 2024
Homeसमाजकारणसूरज कांबळे कुटुंबियांच्या पाठीशी सर्व समाज आरोपींना कठोर शासन करावे...

सूरज कांबळे कुटुंबियांच्या पाठीशी सर्व समाज आरोपींना कठोर शासन करावे -तुळशीराम वाघमारे, सुनीताताई नेटके, तुकाराम सोनटक्के

(तलवाडा/प्रतिनिधी) केज तालुक्यातील सावळेश्वर गावात  सूरज कांबळे या गरीब मोलमजुरी करून उपजीविका भागवनाऱ्या कुटूंबातील युवकावर गाव गुंडा कडून किरकोळ शेतीच्या बांधावरून कुऱ्हाडीने वार करून हल्ला झाला. ही माहिती संत रविदास प्रतिष्ठाण च्या पदाधिकारी यांना समजली असता या विरोधात निषेध व्यक्त करत. सावळेश्वर  येथे पत्रकार तथा प्रतिष्ठाणचे  संस्थापक तुळशीराम वाघमारे, प्रभारी अध्यक्ष तुकाराम सोनटक्के, महिला प्रदेशाध्यक्ष, चर्मकार नेत्या सुनीता नेटके यांनी या ठिकाणी जाऊन सूरज कांबळे व त्यांच्या कुटूंबाची भेट घेतली.

       समाज बांधव या नात्याने त्यांना धीर दिला त्यांच्या सोबत समाजाच्या सर्वच संघटना, सर्व सहकारी हे खंबीर पने उभे आहेत. आणि राहतील अशी ग्वाही दिली. व कुटुंबातील सर्वांची आस्तेवाईक पणे चौकशी करून माहिती घेतली असता या घटनेच्या आधीही या कुटूंबावर दोन वर्षांपूर्वी याच आरोपीनी व त्यांच्या कुटूंबानी अन्याय अत्याचार केला असल्याचे कांबळे कुटूंबानी सांगितले. सुरज कांबळे यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपी विरोधी अनुसूचित जाती, जमाती (आट्रोसीटी) आक्त नुसार गुन्हा दाखल झालेला असून, आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासनाने पंचनामा केला असून योग्य ती कार्यवाही केली जाईल असा शब्द या वेळी दिला आहे.

      या प्रकरणी आरोपीना कठोर शासन व्हावे, या पुढे फिर्यादिस त्रास होऊ नये यासाठी त्यांना पोलीस सरंक्षण द्यावे जेणे करून सदर कुटूंबाला आधार होईल अशी मागणी संत रविदास प्रतिष्ठाण, महाराष्ट्र राज्य च्या वतीने करण्यात आली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय