Wednesday, May 8, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडमहाराष्ट्र पुन्हा नंबर वन! देवेंद्र फडणवीसांचे ट्विट चर्चेत

महाराष्ट्र पुन्हा नंबर वन! देवेंद्र फडणवीसांचे ट्विट चर्चेत

मुंबई : सध्या राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तर लोकसभेच्या निवडणुकाचे वारे आताच वाहू लागले आहे. नुकतेच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर आज त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधत महाराष्ट्र पुन्हा नंबरवन ठरला असल्याचं ट्विट केलं.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विट ने सर्वांचे लक्ष वेधले आहे. फडणवीसांनी ट्विट म्हटलंय, “होय, पुन्हा एकदा एफडीआयमध्ये महाराष्ट्र नंबर 1! आम्ही सातत्यानं सांगत होतो की, खंडणी, वसुली, भ्रष्टाचाराचा महाविकास आघाडीचा काळ संपवून राज्यात नवं सरकार आलं आहे. आता महाराष्ट्रात गुंतवणुकीचा ओघ वाढणार आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा नंबर वन होणार.”



डीआयपीपीनं जानेवारी ते मार्च 2023 या कालावधीचा जो अहवाल सादर केला आहे. त्यात पुन्हा एकदा महाराष्ट्र सर्वाधिक एफडीआय (परकीय गुंतवणूक) प्राप्त करणारं राज्य ठरलं आहे. यामध्ये 29 टक्क्यांसह महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून, कर्नाटक 24 टक्क्यांसह दुसर्‍या तर गुजरात 17 टक्क्यांसह तिसर्‍या क्रमांकावर आहे.


परभणी येथे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत मोठी भरती; 12वी, पदवी, नर्सिंग, फार्मसी, वैद्यकीय पदवीधरांना नोकरीची संधी

Indian Army : भारतीय सैन्य दलात 12वी उत्तीर्णांसाठी भरती

MUHS : नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत विविध पदांची भरती



संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय