Friday, May 3, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडढगाळ वातावरणामुळे सुक्या मासळीची आवक घटली, भाव गगनाला भिडले

ढगाळ वातावरणामुळे सुक्या मासळीची आवक घटली, भाव गगनाला भिडले

अलिबाग : बाजारामध्ये यंदा सुकी मासळीचे (Dry Fish) दर गगनाला भिडले आहेत. देशात जानेवारी पासून मासळी सुकवण्याचा हंगाम सुरू होतो. महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात विशेषतः मालवण,जैतापूर, दाभोळ, अलिबाग, पालघर, वसई, ठाणे, श्रीवर्धन, किनारपट्टीततील मच्छिमार कुटुंबे मोठ्या प्रमाणात मासळी सुकवण्याचा पारंपरिक व्यवसाय करत असतात, यावर्षी हवामान बदलामुळे मासळी सुकवण्यासाठी पोषक वातावरण नसल्याने सुक्या मासळीच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

अवकाळी पावसामुळे मासे सुकवता आले नाहीत. मजुरांचा अभाव तसेच डिझेलचा खर्चही निघत नसल्‍याने मुरूड, अलिबाग, दिवेआगार आदी समुद्र किनारी शेकडो मच्छीमार बोटी नांगरून ठेवल्‍या आहेत. परिणामी सुकी मासळीही बाजारात कमी प्रमाणात असल्‍याने दर वाढले आहेत. जवळा सुकट, अंबाडी, सुके बोंबील, वाकटी इत्यादी सुक्या मासळीचे ग्राहक सामान्य उत्पन्न वर्गातील असतात, पावसाळ्यात भाजीपाला, कडधान्ये याचे दर आवाक्याबाहेरचे असतात, त्यामुळे पावसाळी हंगामात जीवनसत्वयुक्त सुकी मासळी स्वस्त असते म्हणून यात्रेच्या हंगामात व आठवडे बाजारात एप्रिल, मे, जून मध्ये खूप मोठी मागणी असते.

हे सर्व दर वाढले असून कमीतकमी ४०० ते १२०० रुपयांपर्यंत दर पोहोचले आहेत. जवळा म्हणजे बारीक सुकटचे भाव स्थिर असून सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत. कडक उन्हात मासळी सहज वाळत असली तरी मुळातच मासे मिळत नसल्‍याने सुक्या मासळीची कमी आवक, आणि मागणी जास्‍त असे चित्र असल्‍याचे विक्रेत्‍यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्याची आवक कमी झाल्याने दर प्रतिकिलो ३० टक्क्याने वाढले आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक सह विदर्भ, कोकण, मराठवाडा भागातील ग्रामीण शेतमजूर व शहरी मध्यमवर्ग सुकी मासळी पावसाळ्यात रोजच्या आहारात वापरतो.


बाजारभाव (२०२२)(२०२३) कंसातील आकडेवारी


१)साधे सोडे – (१२००रु/१६००रु )-(१८०० रु/२००० रु

२) उच्च दर्जाचे सोडे(१६००रु/१८०० रु)- (२००० रु/२२०० रु)

३) बांगडा छोटा (१०० रु ८ नग) (१०० रु ६ नग)
बांगडा मोठा (१०० रु ६ नग)(१०० रु ४ नग)

४)खारा शिंगाडा (२००रु/३२०रु)-(२५० रु/३७०रु)

५)अंबाडी (४०० रु/-५०० रु)-(४५० रु/६०० रु)

६))सुका जवळा(२१०रु/२८० रु)-(३००रु/३५०रु)

७)बोंबील–(४०० रु/५०० रु)-(६००रु/७०० रु)

८) साधी सुकट (२०० रु/३०० रु)-(२७० रु/३६०रु)

९) वाकटी (३५०रु/४५०रु)-(५००रु/७००रु)

१०) मांदेली (२००रु/२५०रु)-(३५०रु/४००रु)

११) मासे सुकट (खारे) (४००रु)-(५००रु)

मान्सूनमुळे जून महिन्यात मासेमारी व्यवसाय बंद असतो. या काळात किनारपट्टीवरील भागात लोक मिळेल ती शेतीकामातील मजुरी करून गुजराण करत असतात, पर्यटन व्यवसाय थंडावलेला असतो. रोजच्या जेवणातील सुकी मासळीच्या दरात मागील तीन वर्षात मोठी दरवाढ झाल्याचे समजते.

परभणी येथे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत मोठी भरती; 12वी, पदवी, नर्सिंग, फार्मसी, वैद्यकीय पदवीधरांना नोकरीची संधी


Indian Army : भारतीय सैन्य दलात 12वी उत्तीर्णांसाठी भरती




MUHS : नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत विविध पदांची भरती



संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय