Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्याElectoral Bond : स्टेट बँकेच्या निषेधात डाव्या आघाडीचे आझाद मैदानात आंदोलन

Electoral Bond : स्टेट बँकेच्या निषेधात डाव्या आघाडीचे आझाद मैदानात आंदोलन

मुंबई : निवडणूक रोख्यांचा (Electoral Bond) तपशील भारतीय निवडणूक आयोगाला सादर करण्यात भारतीय स्टेट बँक (SBI) ने विलंब केला. लोकसभा निवडणुकीआधी दात्यांची नावे दिली नाहीत. याचा निषेध करीत भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), भारतीय कम्युनिस्ट पक्ष, डावी आघाडी, मुंबई कमिटीने आझाद मैदानात गुरुवारी आंदोलन केले.

एसबीआयने आयोगाला सादर केलेला तपशील आयोगाने संकेतस्थळावर जाहीर करावा, अशी मागणी डाव्या आघाडीच्या वतीने यावेळी करण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयाने सरकारी धोरणाच्या पारदर्शकतेच्या नावाखालील अपारदर्शकतेवरच बोट ठेवले आहे. न्यायालयाने १५ फेब्रुवारी रोजी निकाल देताना २०१७ ची निवडणूक रोखे (Electoral Bond) योजना गैरकायदेशीर ठरवत रद्द केली. मात्र ही माहिती स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांनी दडवली आहे. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

whatsapp link

हे ही वाचा

मोठी बातमी : इलेक्टोरल बॉन्डची माहिती जाहीर भाजप मालामाल, हा मोठा घोटाळा..

मोठी बातमी : केंद्र सरकारकडून 18 OTT प्लॅटफॉर्मवर बंदची कारवाई, ‘ही’ आहे लिस्ट

ब्रेकिंग : भारत जोडो यात्रेत माकप नेते माजी आमदार जे.पी.गावित यांना धक्काबुक्की

खळबळजनक : पुण्यात चक्क अफूची शेती, पोलिसांकडून दोघांना अटक

ब्रेकिंग : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय

ब्रेकिंग : भाजपच्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, राज्यातील २० उमेदवारांचा सामावेश

मुंबईतील ‘या’ आठ रेल्वे स्थानकांची नावे बदलणार, राज्य सरकारचा निर्णय

पुणे जिल्ह्यातील ‘या’ तालुक्याचे नाव बदलण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

संबंधित लेख

लोकप्रिय