Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्याKopardi Crime: दलित तरुणाला विवस्त्र करून मारहाण, अपमानीत भावनेतून आत्महत्या

Kopardi Crime: दलित तरुणाला विवस्त्र करून मारहाण, अपमानीत भावनेतून आत्महत्या

Kopardi Crime : कोपर्डी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोपर्डी येथील एका दलित तरुणाला विवस्त्र करून मारहाण आणि जातिवाचक शिवीगाळ करत स्मशानभूमीत बसल्याची धक्कादायक घटना घडली. यातून अपमानीत झाल्याच्या भावनेतून त्याने आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

सविस्तर माहिती अशी की, कोपर्डी येथे बुधवारी रात्री भैरवनाथ यात्रेच्या निमित्ताने तमाशाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी दलित तरूण नितीन शिंदे (वय ३७ वर्षे) हा तमाशा सुरू असताना व्यासपीठाजवळ नाचत होता. त्यावेळी काही जणांनी त्याच्या नाचण्याला हरकत घेत त्याला मारहाण केली. यावेळी काही जणांनी मध्यस्थी करत भांडण सोडवले. मात्र त्याला घरी जात असताना दिनेश ऊर्फ बंटी बाबासाहेब सुद्रिक, स्वप्निल बबन सुद्रिक, वैभव मधुकर सुद्रिक या तिघांनी त्याला रस्त्यात अडवले.

तसेच, दलित तरुण नितीन शिंदे याला जातिवाचक शिवीगाळ करत विवस्त्र करून मारहाण करण्यात आली. त्याचा मोबाईलही काढून घेण्यात आला. त्याला रात्रभर स्मशानभूमीत बसण्यात आले. अखेर सकाळी त्याने घरी निरोप पाठवला तेव्हा त्याचे नातलग कपडे घेऊन आले आणि त्याला घरी नेले. त्यावेळी अपमानीत झाल्याच्या भावनेतून नितीन शिंदे याने घरातच आत्महत्या केली. गुरुवार, २ मे रोजी ही दुर्दैवी घटना कोपर्डी येथे घडली.

Kopardi Crime

या तरुणाने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून याचा उलगडा झाला असून याआधारे तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणाने चिठ्ठीमध्ये असे लिहले आहे की, स्वप्निल सुद्रिक आणि बंटी सुद्रिक हेच माझ्या आत्महत्येला जबाबदार आहेत. याप्रकरणी मृताचे वडील कांतीलाल शिंदे यांनी कर्जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तसेच याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, या घटनेनंतर कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी कर्जत पोलिसांनी कोपर्डीत मोठा बंदोबस्त वाढवला आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : ठाकरे गटाच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला, 25 ते 30 जणांवर गुन्हा दाखल

ब्रेकिंग : सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेले हेलिकॉफ्टर क्रॅश

MPSC च्या रखडलेल्या तारखांबाबत मोठी अपडेट, वाचा !

मोठी बातमी : राहुल गांधींना या मतदार संघातून उमेदवारी जाहीर

‘हिंदू विधि झाले नसल्यास ते लग्न ग्राह्य धरले जाणार नाही’ सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

कोरोना लसीचे साईड इफेक्ट; लस प्रमाणपत्रावरून पंतप्रधान मोदींचा फोटो हटवला, चर्चेला उधान

‘अनुपमा’ फेम अभिनेत्री रुपाली गांगुली राजकारणात उतरली, ‘या’ पक्षात केला प्रवेश

ब्रेकिंग : मिमिक्री आर्टिस्ट श्याम रंगीला पंतप्रधान मोदींच्या विरोधात लढणार निवडणूक

निवडणूकीच्या अगोदर अरविंद केजरीवाल यांना अटक का ? सर्वोच्च न्यायालयाचे ईडीला ५ प्रश्न

काँग्रेस मुख्यालयावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना वाचताही येईना, प्रश्न विचारताच विद्यार्थ्यांची फजिती

संबंधित लेख

लोकप्रिय