Friday, May 17, 2024
Homeजिल्हाकोल्हापूर : ईएसआयसी हॉस्पिटलला मेडीकल साधन सामुग्री, निधी उपलब्ध करुन देण्याची नागरी...

कोल्हापूर : ईएसआयसी हॉस्पिटलला मेडीकल साधन सामुग्री, निधी उपलब्ध करुन देण्याची नागरी कृती समितीची मागणी

कोल्हापूर : ईएसआयसी हॉस्पिटलला मेडीकल साधन सामुग्री, निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीने कर्मचारी राज्य विमा महामंडळ रुग्णालयाचे मेडिकल सुपारिडटें रवींद्र पवार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली.

निवेदन देतावेळी झालेल्या चर्चेत रवींद्र पवार म्हणाले, हे हॉस्पिटल सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक वर्षाच्या कालावधीच्या आत परिपूर्ण करून पूर्ण सेवा देण्याचे आश्वासन दिले असून सदर जिल्ह्यातील 1 लाख 30 हजार कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील लोकांसह सहा लाख लोकांना याचा लाभ होणार आहे.

निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या वतीने कोल्हापूर मध्ये ईएसआयसी हॉस्पिटल सुरू आहे. भव्य अशी सुसज्ज इमारत असणारे हे हॉस्पिटल आवश्यक स्टाफ आणि साधन सुविधा शिवाय सुरू असून त्या ठिकाणी कामगारा सारख्या रुग्णांना आजच्या या कोरोना महामारी आवश्यक ते उपचार मिळत नाहीत. केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली असणाऱ्या या हॉस्पिटलचा फक्त दिखावाच आहे की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे.

आज संपूर्ण देशाला आरोग्य सुविधांची गरज आहे, उपचारा अभावी रुग्णांची हेळसांड होत आहे. म्हणून कोल्हापुरात असणारे हे हॉस्पिटल परिपूर्ण सुस्थितीत चालू होण्यासाठी भारत सरकारच्या (श्रम व रोजगार मंत्रालयाने) त्वरित त्यासाठी लागणारी मेडिकल साधनसामग्री आणि निधीची पूर्तता करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

त्याचबरोबर हॉस्पिटल प्रशासनाने खालील गोष्टींचा लेखी व जाहीर खुलासा करावा या हॉस्पिटल मध्ये कोण कोणत्या जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचा समाविष्ट आहेत, येथे कोण कोणत्या आजारावर उपचार केले जातात, या ठिकाणी किती कामगार नोंदणीकृत आहेत व त्यांना किती रकमेच्या बिला पर्यंत येथे मोफत उपचार केले जातात. हे हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने चालू नसल्याने या हॉस्पिटल मार्फत कर्मचारी पेशंटला शासनाच्या वतीने कोणकोणत्या योजने मध्ये दाखल केले जाते, तेथे त्यांना परिपूर्ण सुविधा मिळतात का? त्याची शासकीय ऑडिट झाले आहे का? या खाजगी हॉस्पिटलच्या उपचाराचा किती कामगार कर्मचाऱ्यांना लाभ मिळाला आहे. किती कर्मचारी पेशंट हे महाराष्ट्र शासनाच्या विविध आरोग्य योजनेचा लाभ घेत आहेत त्यामुळे भारत सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालय यांच्या वतीने निर्माण केलेल्या या आरोग्य सुविधांचा लाभ हक्कदार कर्मचाऱ्यांना मिळत नाही याचा विचार भारत सरकारने करून कोल्हापुरात सुरु असलेले  ई एस आय सी हॉस्पिटल त्वरित सर्व सुविधांसह परिपूर्ण करावे अशी मागणी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीचे अशोक पोवार, रमेश मोरे, भाऊ घोडके, अजित सासने, प्रमोद पुंगावकर, चंद्रकांत पाटील, अंजुम देसाई यांनी केली आहे.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय