Monday, December 9, 2024
Homeराजकारणकाँग्रेस नेते राजीव सातव यांचे दुःखद निधन

काँग्रेस नेते राजीव सातव यांचे दुःखद निधन


पुणे
: गेल्या काही दिवसांपासून करोनाशी झुंज देत असलेले काँग्रेसचे नेते खासदार राजीव सातव यांचं दुःखद निधन झालं आहे. राजीव सातव यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू होते.

शुक्रवारी रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर, डॉक्टरांनी त्वरीत औषधोपचार सुरू केल्यानंतर शनिवारी दिवसभरात त्यांच्या मध्ये सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले होते मात्र, कोरोनानंतर आजाराशी त्यांची झुंज देत असताना सातव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

१९ एप्रिल रोजी सातव यांना कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याने त्यांनी कोरोना चाचणी करून घेतली. त्यानंतर २२ तारखेला त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर सातव यांना ‘सायटोमेगँलोव्हायरस’ या नव्या विषाणूची लागण झाल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले होते.

दरम्यान, २३ एप्रिल रोजी सातव यांना जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्याची प्रकृती चांगली होती. मात्र, २५ एप्रिलनंतर प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना आयसीयू वार्डात हलवण्यात आले होते.

संबंधित लेख

लोकप्रिय