Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडKokan tour : मालवण, चिपळूण, सावंतवाडी; माझ्या कोकणात तुमची वळवा गाडी

Kokan tour : मालवण, चिपळूण, सावंतवाडी; माझ्या कोकणात तुमची वळवा गाडी

माझ्या कोकणची वाट नागमोडी, उंच उंच डोंगर आणि हिरवी झाडी असे कोकणचे वर्णन केले जाते. भारतातील कोकण हा प्रदेश भारता पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भागात असलेला भूमीचा पट्टा आहे. कोकण किनारपट्टी हा एक 560 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र,गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात येतो. (Kokan tour)


कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. माडांच्या राया, आंबे, सुपारी, केळीच्या बागा, फणस, काजू, कोकमाची झाडे आणि डोंगरउतारांवर केलेली भातशेती हे खूप मोठ्या प्रमाणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही या कोकण पट्ट्यातच आहे.कोकण म्हणजे स्वर्गच आहे. (Kokan tour)

सुंदर समुद्रकिनारे, हिरवळ आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा असलेली हेमाडपंथी मंदिर यासाठी कोकण ओळखले जाते. हा प्रदेश तोंडाला पाणी आणणारे सीफूड आणि पारंपारिक पाककृतीसाठी प्रसिद्ध आहे.

स्वच्छ आणि विस्तीर्ण समुद्रकिनारे हे महाराष्ट्र राज्याचे वैभव आहे. नारळाच्या झाडांनी बहरलेले प्रसन्न समुद्र किनारे, मऊ, रेशमी वाळू, समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा पाहत आणि समुद्राची गाज ऐकत निवांत वेळ घालवायचा असेल तर तुमच्यासाठी महाराष्ट्रात अनेक आकर्षक पर्याय उपलब्ध आहेत.

कोकणात भेट देण्यासाठी चांगली प्रेक्षणीय स्थळे कोणती आहेत?
कोकणात कुठे हि जा निसर्ग तुम्हाला आवडेल, कोकणात मुरुड जंजिरा किल्ला आहे, दिवे आगार, हरिहरेश्वर, शिवाजी महाराजांची राजधानी किल्ले रायगड, केळशी समुद्र कासवांची अंडी आणि पिल्ले पाहता येतील, हर्णे बंदर, मार्लेश्वर देवस्थान, गणपतीपुळे, आरे वारे समुद्र, विजय दुर्ग, मालवण किल्ला, गुहागर समुद्र किनारा, कुणकेश्वर,भराडी देवी मंदिर, आंबोली घाट,आणि इतर बर्याच ठिकाणे पाहायला मिळतील.


मुंबईपासून ते वेंगुर्ल्यापर्यंत पसरलेल्या या किनाऱ्यावर पर्यटकांना खिळवून ठेवणारी अनेक ठिकाणे आहेत. कोल्हापूरपासून ज‌वळ असलेले रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे म्हणजे तळकोकण आहे. गडकिल्ले, धार्मिक स्थळे, सागरी किनारे आणि थंड हवेची ठिकाणे पर्यटकांना नेहमीच साद घालतात.
कोकण खाद्य संस्कृती शाकाहारी मांसाहारी

मालवणात सोलकढी, गरमागरम भात व तळलेली मासोळी या तिन्हीचं कॉम्बिनेशन अप्रतिम असतं. हे तिन्ही पदार्थ असले तर भाजीची आठवणसुद्धा येत नाही! दुसरं एक कॉम्बिनेशन म्हणजे डाळीची आमटी, तळलेला ओला बांगडा किंवा भाजलेल्या सुक्‍या बांगड्याची कोशिंबीर असली तर मग विचारायलाच नको!

संकलन – क्रांतीकुमार कडुलकर, पत्रकार, पिंपरी चिंचवड (सौजन्य इंटरनेट)

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालक पदावरून बदली; महाविकास आघाडीला मोठे यश

दिवाळीच्या फराळातून मतदारांना पैसे वाटप ; सांगलीत शरद पवार गटाचे उमेदवार अडचणीत

मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीतून माघार

कॉँग्रेसची दुसरी यादी जाहीर ; वाचा कुणा कुणाला मिळाली संधी

आशा व गटप्रवर्तकांना निवडणूक कामाचा भत्ता देण्याची मागणी

ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर

जयश्री थोरातांवर भाजप नेत्याची आक्षेपार्ह टीका ; अहमदनगरमध्ये जाळपोळ

लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर


संबंधित लेख

लोकप्रिय