Friday, November 22, 2024
Homeजुन्नरJunnar : आदिवासी बांधवांच्या उपोषणास वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा

Junnar : आदिवासी बांधवांच्या उपोषणास वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा

Junnar : उपविभागीय अधिकारी, कार्यालय मंचर येथे सुरू असलेल्या आदिवासी बांधवांच्या उपोषणास वंचित बहुजन आघाडी, जुन्नर तालुक्याच्या (Junnar) वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.

जुन्नर – आंबेगाव तालुक्यातील येडगाव, खोडद, हिवरे, थोरादळे, काठापूर ई. गावांमधील सरकारी वन जमिनीमध्ये आदिवासी बांधवांची घरे कोणतीही पूर्वकल्पना किंवा सूचना न देता जेसीबी च्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली, नत्यामुळे आदिवासी बांधव बेघर झाले आहेत, आदिवासी बांधवांचे त्याच जागेत पुन्हा पुनर्वसन करावे, तसेच दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी, कार्यालय मंचर येथे वंचित बहुजन आघाडी प्रणित एकलव्य संघटना, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ३०० ते ३५० आदिवासी बांधव बेमुदत उपोषणास बसले आहेत. Junnar

या बांधवांना वंचित बहुजन आघाडी, जुन्नर तालुक्याच्या वतीने लेखी पत्राद्वारे जाहिर पाठिंबा देण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडी जुन्नर तालुका अध्यक्ष गणेश वाव्हळ, महासचिव सागर जगताप, प्रा. किशोर चौरे, सागर पवार यांनी पाठिंब्याचे पत्र एकलव्य संघटनेचे राज्य अध्यक्ष अनिल जाधव यांना दिले.

whatsapp link

हे ही वाचा

मोठी बातमी : इलेक्टोरल बॉन्डची माहिती जाहीर भाजप मालामाल, हा मोठा घोटाळा..

मोठी बातमी : केंद्र सरकारकडून 18 OTT प्लॅटफॉर्मवर बंदची कारवाई, ‘ही’ आहे लिस्ट

ब्रेकिंग : भारत जोडो यात्रेत माकप नेते माजी आमदार जे.पी.गावित यांना धक्काबुक्की

खळबळजनक : पुण्यात चक्क अफूची शेती, पोलिसांकडून दोघांना अटक

ब्रेकिंग : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय

ब्रेकिंग : भाजपच्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, राज्यातील २० उमेदवारांचा सामावेश

मुंबईतील ‘या’ आठ रेल्वे स्थानकांची नावे बदलणार, राज्य सरकारचा निर्णय

पुणे जिल्ह्यातील ‘या’ तालुक्याचे नाव बदलण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

संबंधित लेख

लोकप्रिय