Saturday, May 18, 2024
Homeग्रामीणजुन्नर : नाणेघाट परिसरात पर्यटनासाठी उपद्रव शुल्क आकारले जाणार

जुन्नर : नाणेघाट परिसरात पर्यटनासाठी उपद्रव शुल्क आकारले जाणार

जुन्नर : पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या नाणेघाट परीसरात पर्यटकांचा ओघ वाढला आहे. या ठिकाणी नाणेघाटातील सातवाहान कालीन लेणी, दगडीरांजण, रिव्हर्स वॉटर फॉल, जीवधन किल्ला, कोकणकडा, वानरलिंगी सुळका, ब्रिटीश कालीन बंधारा, भोरसरी धबधबा, पावसाळ्यातील हिरवळ आणि धुके याचा आनंद घेण्यासाठी लाखो पर्यटक येत असतात. आता जुन्नर वनविभाग व संयुक्त वन व्यवस्थापन समितीने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

नानेघाट परिसरात काही पर्यटक मद्यपान करून हुल्लड बाजी करत आसतात. तर काही प्लास्टिक कचरा परीसरात पसरवतात. याचा प्लास्टिकमुळे पर्यावरण धोका निर्माण होतो आहे. तसेच मद्यपीमुळे व हुल्लड बाज पर्यटकांमुळे पर्यटस्थळांचे वातावरण दुषी आहेत. या प्रकारांना आळा बसावा. तसेच गावातील तरूणांना रोजगार उपलब्ध व्हावा. या उद्देशाने जुन्नर वनविभाग व संयुक्त वन व्यवस्थापन समिती घाटघर यांच्या माध्यमातून या ठिकाणी उपद्रव शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपद्रव शुल्क हे प्रति व्यक्ती १० रुपये इतके आकारले जाणार आहे.

यावेळी उपवनसंरक्षक अमोल सातपुते म्हणाले, “स्वच्छ सुंदर जबाबदारी पर्यटन घडवून आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजेत” या टोल नाक्यामुळे शिस्तबद्ध पर्यटन, कचरा मुक्त पर्यटन व सुरक्षित पर्यटनाचा चालना मिळणार असून येणाऱ्या पर्यटकांची येथील निसर्ग प्रदूषित करू नये, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हान यांनी केली.

त्यावेळी सहायक वनरक्षक अमित भिसे, सरपंच मनोज नांगरे, पोपट रावते, वनपाल नितीन विधाते, मारूती फुलसुंदर, वनरक्षक राजेंद्र गायकवाड, सचिन कवटे, संदिप लांडे, मारूती साबळे इत्यादी सह ग्रामस्थ उपस्थित होते.

हे ही वाचा :

ब्रेकिंग : 9 आमदार आणि 3 खासदार निलंबित; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोडी

मोठी बातमी : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार, मनसेकडून प्रस्ताव ?

मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये मोठे बदल, अध्यक्षपदी “या” नेत्याची केली निवड

उध्दव ठाकरेंना धक्का; दोन निष्ठावंतांचा शिंदे गटात प्रवेश

आदिवासी मजुरावर लघुशंका : भाजप नेत्यास अटक ; घरावर बुलडोझर

ब्रेकिंग : अजित पवारांच्या सरकारमधील सहभागानंतर शिंदे गट ॲक्शन मोडवर, केला “हा” निर्धार

आनंदाची बातमी : गाई पाळा अन् मिळवा तब्बल ‘इतके’ लाख अनुदान; सरकारने सुरू केली ‘ही’ योजना

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय