Sunday, May 19, 2024
Homeआरोग्यकोरोनाजुन्नर : आमदार बेनके व कुटुंबियांकडून कोव्हीड केअर सेंटरला लाखोंंची मदत

जुन्नर : आमदार बेनके व कुटुंबियांकडून कोव्हीड केअर सेंटरला लाखोंंची मदत

जुन्नर (पुणे) : किल्ले शिवनेरीचे आमदार अतुल बेनके व कुटुंबियांकडून तालुक्यातील कोव्हीड केअर सेंटरला लाखोंची मदत दिली. 

आमदार बेनके व कुटुंबियांच्या वतीने सोमतवाडी आश्रमशाळा कोविड सेंटरला १ लाख रुपये मदत स्वरूपात, ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट ला १ लाख ४० हजार रुपये देणगी स्वरूपात आणि आळे येथील कोविड केअर सेंटरला १ लाख रु. कोरोना लढ्यासाठी मदत स्वरूपात दिले.

यावेळी आ. बेनके म्हणाले की, आजच्या घडीला सध्याची परिस्थिती आणि कोरोना आजाराने घातलेलं थैमान पाहता मनात तुकोबांच्या वरील ओळी आठवल्या शिवाय राहत नाही.

रात्री दिवस आम्हां युद्धाचा प्रसंग |

अंतर्बाह्य जन आणि मन ||

जीवाही आगोज पडती आघात |

येउनिया नित्य नित्य करी ||२||

रात्र काय आणि दिवस काय प्रत्येक क्षणाला फोन वाजतोय समोरून मदतीचा आक्रोश होतोय. अशा परिस्थितीत आपण जनतेला आधार देणं आणि प्रत्येकाच्या मनात या परिस्थितीशी लढण्यासाठी आत्मविश्वास जागवणे महत्वाचे आहे. सध्याच्या कसोटीच्या काळात आपल्यातील अनेक संस्था व सहकारी विविध पातळीवर काम करत आहेत. अशा संस्था व सहकाऱ्यांना आर्थिक, मानसिक आणि सामाजिक पातळीवर सहकार्य करणे हे कर्तव्य आहे, असेही ते म्हणाले.

पुढे आ. बेनके म्हणाले, या संकटावर आपल्याला मात करायची आहे. या भावनेने प्रत्येकाने आपले कर्तव्य समजून नियम व अटींचे पालन करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. स्वच्छता पाळा मास्क व सॅनिटायझरचा वापर करा. घराबाहेर वावरताना सुरक्षित सामाजिक अंतर ठेवा.

अधिक वाचा

जुन्नर : खासदार अमोल कोल्हे यांनी सोमतवाडी कोव्हीड केअर सेंटरची केली पाहणी

जुन्नर : लेण्याद्री कोव्हीड केअर सेंटरची खा. कोल्हे यांनी केली पाहणी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय