जुन्नर / रफिक शेख : बेल्हे येथील गरजूंना पंतप्रधान आवास घरकुल योजने अंतर्गत घरकुल देण्याची मागणी ‘लोकभारती’च्या वतीने जुन्नर तालुका महिला अध्यक्ष श्रीमती छाया ताई उपालकर यांनी बेल्हे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या वेळी या वेळी बेल्हे गावचे सरपंच गोरक्षनाथ वाघ तसेच इतर सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.
गाव मौजे बेल्हे व संपूर्ण जुन्नर तालुक्यातील गरीब भूमिहीन बेघर गरजू लोकांना पंतप्रधान आवास घरकुल योजने अंतर्गत घरकुल मिळावे या करिता गेल्या 6 ते 7 वर्षांपासून प्रलंबित असणारा प्रश्न मार्गी लागून गरिबांना त्याच्या हक्काचे घर मिळावे व शासनाने अश्या नागरिकांची दखल घेऊन तात्काळ सदर प्रश्न सोडवावे, यासाठी ‘लोकभारती’ काम करत असल्याचे खालिद शेख यांनी सांगितले.