Thursday, August 11, 2022
Homeग्रामीणपालघर : जिल्हा परिषद समाजकल्याण सभापतीपदी रामू पागी यांची बिनविरोध निवड !

पालघर : जिल्हा परिषद समाजकल्याण सभापतीपदी रामू पागी यांची बिनविरोध निवड !

spot_imgspot_imgspot_imgspot_img

पालघर : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीच्या सभापतीपदी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे गटनेते कॉ. रामू पागी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

जिल्हा परिषद पालघरच्या समाज कल्याण समितीच्या सभापतीपदाची निवडणूक २९ जुलै २०२१ रोजी पार पडली. यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ठाणे-पालघर जिल्हा कमिटी सदस्य, तलासरी झाई गटाचे जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा परिषदेतील माकपचे गटनेते कॉम्रेड रामू पागी यांची बिनविरोध निवड झाली. 

पालघर जिल्हा वेगळा झाल्यापासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पालघर जिल्हा परिषदेतील पहिले सभापती होण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे. 

या वेळी आमदार कॉम्रेड विनोद निकोले, आमदार सुनील भुसारा, आमदार राजेश पाटील,आमदार श्रीनिवास वनगा तसेच महाविकास आघाडीचे सर्व जि.प.सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय