पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड मनपाच्या महिला, युवती कल्याण योजने अंतर्गत परदेशी उच्च शिक्षणासाठी निवड झालेल्या युवतीस दीड लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.
2020 – 21 या आर्थिक वर्षात अमृता कडुलकर या विद्यार्थिनींची हॉफ युनिव्हर्सिटी जर्मनी येथे पदव्युत्तर एम बी ए (ग्लोबल मॅनेजमेंट/इंटरनॅशनल बिझिनेस अँड फायनान्स ) साठी निवड झाली आहे.
मनपाच्या नागरवस्ती विकास योजने अंतर्गत महिला युवती कल्याणासाठी शहरातील विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या आणि परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या स्मृती प्रित्यर्थ दीड लाखाचे अनुदान दिले जाते.
अमृता कडुलकर या विद्यार्थिनीस सदरचे आर्थिक सहाय्य मुलीच्या बँक खात्यावर जमा झाल्याची माहिती मुलीची आई शैलजा कडुलकर यांनी दिली आहे.
मार्च 2021 पासून बवेरीया, जर्मनी येथे ती शिक्षण उच्च शिक्षण घेत आहे. टाटा मोटर्स विद्यानिकेतन शाळा आणि प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर, चिंचवड ची ती विद्यार्थिनी आहे.