Saturday, May 18, 2024
Homeकृषीजुन्नर : पावसामुळे शेतीची मशागत सुरू

जुन्नर : पावसामुळे शेतीची मशागत सुरू

जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यात गेले पंधरा दिधस सातत्याने पाऊस पडत आहे. पावसाबरोबर जोराचा वारा त्यामुळे आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. तर जुन्नर तालुक्यातील हिरडा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच यंदाच्या हंगामात करवंदाचा बहर कमी आल्यामुळे नागरिकांना करवंदे ही विकता आली नाही.

तालुक्यातील पुर्व भागात फळे आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. तर आदिवासींंचे आर्थिक साधनापैकी एक असलेल्या हिरड्याचेही मोठे नुकसान झाले आहे.

प्रमुख्याने पश्चिम आदिवासी भागात भात हे मुख्य पिक आहे. भाताच्या पिकाची तयारी करण्यासाठी मशागत करावी लागते. यावर्षी कमी अधिक प्रमाणात पडलेल्या पावसामुळे भात शेतीच्या मशागतीस वेग आला आहे. गेल्या वर्षी किड, रोगामुळे भात शेतीचे मोठे नुकसान झाले होते.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय