Wednesday, August 17, 2022
Homeग्रामीणजुन्नर : खटकाळे येथे रोजगार मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न, मोठ्या संख्येने महिलांचा...

जुन्नर : खटकाळे येथे रोजगार मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न, मोठ्या संख्येने महिलांचा लक्षणीय सहभागी !

spot_imgspot_imgspot_imgspot_img


जुन्नर : मनरेगा कायद्याच्या अंतर्गत गावागावातील नवीन संसाधनाची निर्मिती होईल आणि लोकांच्या हाताला काम आणि त्या कामाचा योग्य मोबदला मिळेल. हे त्यानी कायदा समजावून सांगताना सांगितले. रोजगार हमी योजना ही महिला बचत गट आणि महिलांना आर्थिक बळ देणार आणि पुरुष आणि महिलांना समान मजुरी देणारी ही एकमेव योजना आहे, असे मनरेगाचे अभ्यासक राजू घोडे यांनी सांगितले.

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणी आणि जनजागृतीसाठी जुन्नर तालुका किसान सभेच्या वतीने आयोजित रोजगार मेळावा आज (दि.१८) ग्रामपंचायत खटकाळे – खैरे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ते त्यावेळी बोलत होते, अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत खटकाळे – खैरे च्या सरपंच शकुंतला मोरे होत्या.

पुढे बोलताना घोडे म्हणाले, ग्रामीण भागातील गावाचा पायाभूत सुविधांचा विकास आणि गावातील माणसाला गावातच रोजगार हे माध्यम आहे, असे घोडे म्हणाले. घोडे यांनी रोजगार हमी कायदा सोप्या भाषेत लोकांना समोर मांडला.

गावागावातील लोकांच्या हाताला काम आणि दाम मिळण्यासाठी हा मेळावा घेत आहोत  आणि तालुक्यातील 15 गावात मनरेगाच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये रोजगार निर्माण केला आहे, असे किसान सभेचे तालुका सचिव लक्ष्मण जोशी यांनी प्रास्ताविकेत सांगितले.

जुन्नर तालुक्यात पश्चिम आदिवासी गावांमध्ये भात लावणी संपली की लोकांना रोजगारासाठी स्थलांतर करावे लागते किंवा रोजगारासाठी इतर गावामध्ये जावे लागते. त्यामुळे किसान सभेने महात्मा गांधी रोजगार हमी कायद्याच्या अंतर्गत रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. कृषी विभागाच्या कृषी सहाय्यक मडके आणि कृषी सहाय्यक भालेकर यांनी कृषी विभागाच्या योजनांची माहिती दिली.

तसेच माणकेश्वर गावाचे मनरेगा मजूर कोंडीभाऊ बांबळे यांनी रोजगार हमीवर त्याच्या कामाचा अनुभव मांडला. त्यानंतर लताताई केदारी यांनी गावागावातील बचत गटांच्या महिलांना रोजगार हमीवर काम केल्याने महिला घर सांभाळून आपापल्या गावातच काम मिळेल आणि महिला स्वता सक्षम होतील, असेही ते म्हणाले.

मेळाव्याचे स्वागत व आभार नवनाथ मोरे यांनी व्यक्त केले. मेळाव्यास उपसरपंच भरत मोडक, माजी उपसरपंच लता केदारी, सामाजिक कार्यकर्ते देवका मोरे, माजी सरपंच रामदास झाडे, निमगिरी ग्रामपंचायत सदस्य संजय साबळे, ग्रामसेवक के. टी. साबळे, ग्राम रोजगार सेवक सचिन मोरे, किसान सभेचे नारायण वायाळ, कोंडीभाऊ बांबळे, एसएफआय चे  राजेंद्र शेळके, तसेच बचत गट प्रतिनिधी, सीमा साबळे, अनुसया लांडे, तसेच देवळे, हिरडा, खैरे -खटकाळे, निमगिरी, केवाडी, उंडेखडक, हडसर गावातील महिला बचत गट वृक्ष संगोपन करणारे मजूर यावेळी उपस्थित होते.

 

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय