Friday, November 22, 2024
Homeक्राईमजुन्नर : भरदिवसा आठवडे बाजारात तरूणीवर चाकूने भ्याड हल्ला, मदतीला आलेल्या महिलेवरही...

जुन्नर : भरदिवसा आठवडे बाजारात तरूणीवर चाकूने भ्याड हल्ला, मदतीला आलेल्या महिलेवरही वार

ओतूर (ता. 25) : जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ओतूर येथील आठवडे बाजारात एका इसमाने भरदिवसा तरुणीवर चाकूने भ्याड हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

नेहमीप्रमाणे गुरूवारी (दि. 25) ओतूरचा आठवडे बाजार भरला होता. त्यावेळी बाजारातच तरूण आणि तरूणी या दोघांमध्ये काही कारणास्तव वाद झाला, त्यांच्यात बाचाबाची सुरू असतानाच तरुणाने अचानकपणे तरुणीवर चाकूने हल्ला केला. तीने प्रतिकार करत पळण्याचा प्रयत्न केला मात्र काही अंतरावर गेली असता अति रक्तस्त्राव झाल्याने ती जमिनीवर कोसळली. यावेळी मदतीला आलेल्या महिलेवरही त्या इसमाने वार केला. त्यानंतर त्याने स्वतःच्या पोटात देखील वार केला. त्यावेळी नागरिकांची बघ्याची भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या घटनेमुळे बाजारातच काही काळ घबराट पसरली होती.

वर्षा शांताराम खरात (वय ३२, रा. जांभळे, ता. अकोले, जि. अहमदनगर) व ज्योती अंबादास वायकर (वय ३५, रा. ओतूर, ता. जुन्नर) अशी चाकू हल्ला झालेल्या दोघींची नावे आहेत. तर संतोष मारुती ठोसर (वय ३४, रा. मांदारने, ता. जुन्नर) असे हल्लेखोराचे नाव आहे.

या घटनेनंतर वर्षा हिला उपचारासाठी आळेफाटा येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर संतोष ठोसर याच्यावर नारायणगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सध्या पोलिस सदर घटनेचा तपास करत आहेत.

हे ही वाचा :

संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाचा वाद; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

एअर फोर्स स्कूल, एअर फोर्स स्टेशन ठाणे अंतर्गत विविध पदांची भरती

महाराष्ट्रात आम आदमी पार्टी पाय रोवणार ? राज्यव्यापी ‘स्वराज्य यात्रा’

पुणे : FTII च्या विद्यार्थ्यांचे उपोषणच सुरू; विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली

राजू शेट्टी ‘या’ मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढा; तर स्वाभिमानी शेतकरी संघटना ‘इतक्या’ जागा लढणार

पुणेकरांनो ! नो पार्किंग मध्ये गाडी लावताय ? मग नवे दंड पहाच! खिशाला बसेल मोठा भुर्दंड…

संबंधित लेख

लोकप्रिय