Friday, May 3, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपुणेकरांनो ! नो पार्किंग मध्ये गाडी लावताय ? मग नवे दंड पहाच!...

पुणेकरांनो ! नो पार्किंग मध्ये गाडी लावताय ? मग नवे दंड पहाच! खिशाला बसेल मोठा भुर्दंड…

पुणे : शहरात नो पार्किंगमध्ये वाहन लावणाऱ्या दुचाकीस्वारांना पहिल्यांदा टोइंगसह ७८५ रुपये, मोटारचालकांना एक हजार ७१ रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तर दुसऱ्यांदा नो पार्किंगमध्ये वाहन लावल्यास अनुक्रमे एक हजार ७८५ रुपये आणि दोन हजार ७१ रुपये दंड भरावा लागणार आहे. यामुळे नो पार्किंगमध्ये वाहने लावणाऱ्यांवर चाप बसणार आहे. मोटार व्हेइकल ॲक्टनुसार शहर वाहतूक शाखेने दंडाच्या रकमेबाबत सूचनापत्र जारी केले आहे.

नो पार्किंगमधून वाहन उचलल्यानंतर दंडाची रक्कम भरताना संबंधित वाहनावर पूर्वीच्या दंडाची रक्कम प्रलंबित असल्यास कमीत कमी एक दंड भरावा लागेल. त्यामुळे कमीत कमी दोन चलनाची रक्कम भरल्याशिवाय ही प्रक्रिया पूर्ण होत नाही. वाहतूक पोलिस या मशिनमध्ये बदल करू शकत नाहीत. त्यामुळे वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहनचालकांनी पोलिसांसोबत वाद घालू नयेत, असे आवाहन वाहतूक शाखेने जारी केलेल्या पत्रकाद्वारे केले आहे. केवळ डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारेच दंडाची रक्कम घेतली जाते.

वाहतूक नियम पहिल्यांदा आकारण्यात येणारी दंडाची रक्कम; दुसऱ्यांदा आकारण्यात येणारी दंडाची रक्कम पुढीलप्रमाणे :

वाहन प्रकार – दुचाकी – चारचाकी – दुचाकी – चारचाकी

नो पार्किंग – ५०० रुपये – ५०० रुपये – १५०० रुपये – १५००

टोइंग चार्ज – २०० – ४८४ – २०० – ४८४

जीएसटी – ८५.५६ – ८७.१२ – ८५.५६ – ८७.१२

एकूण (रुपयांत)
७८५.५६ – १०७१.१२ – १७८५.५६ – २०७१.१२

व्हिडिओ : स्वतःच्या लग्नात नवरदेव असा नाचला की कोरिओग्राफर लाजला

NHM : राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा अंतर्गत विविध पदांची भरती

AHD : पुणे पशुसंवर्धन विभाग अंतर्गत मेगा भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय