Wednesday, August 17, 2022
Homeग्रामीणजुन्नर : चावंड येथे नोकरदार ग्रुपच्या वतीने दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा...

जुन्नर : चावंड येथे नोकरदार ग्रुपच्या वतीने दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

spot_imgspot_imgspot_imgspot_img

जुन्नर चावंड ग्रामपंचायत क्षेत्रातील नोकरदार ग्रुपच्या वतीने दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला.

‘नवं पर्व, नोकरदार सर्व’ या नोकरदार वर्गाच्या ग्रुपच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हे पण पहा ! पीक विमा प्रश्नी पुणे कृषी आयुक्त कार्यालयावर किसान सभेचा मोर्चा

कार्यक्रम अध्यक्षस्थानी दुंदा मोरे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक येथे उपमुख्य कार्यकारी पदावर कार्यरत असणारे इशाधीन शेळकंदे उपस्थित होते. ‘विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या वाटा’ या विषयावर डॉ. रोशन मोरे यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी नोकरदार वर्गाचे वतीने प्रा. सोमनाथ शिंगाडे व डॉ. सोनू लांडे यांनी स्वानुभव कथन केले. कार्यक्रम यशस्वी करणेसाठी दत्तू शेळकंदे, पंढरीनाथ लांडे, विजय बोऱ्हाडे, रामदास लांडे यांनी मेहनत घेतली बाळासाहेब लांडे, सुनील लांडे यांचे मार्गदशन लाभले.

हे वाचा ! धार्मिक स्थळे लवकरात लवकर खुली करा, भाजप युवा मोर्चाचे आंदोलन 

सदर कार्यक्रमासाठी चहापाणी, बैठक, स्पीकर व्यवस्था ऋषिकेश परिवार स्वयंसहायता समूह केळी यांनी केली. या कार्यक्रमासाठी जनकल्याण संस्था, ऋषीकेश परिवार, कुंभाई माता प्रतिस्थान, माणकेश्वर ट्रस्ट या विविध संस्थांचे सहकार्य लाभले.

गणपत जोशी यांनी प्रास्ताविक केले पांडुरंग गवारी यांनी सूत्रसंचालन केले, तर दिलीप शेळकंदे यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी, पालक, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय