Junnar /आनंद कांबळे : राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षाविषयक उपायोजनाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या निमित्ताने राज्य शासन व शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या वतीने दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी विद्यार्थी व शाळा यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एक शासन निर्णय पारित करण्यात आला.
या शासन निर्णयाच्या अनुषंगाने लगेचच ग्रामपंचायत उच्छिल यांनी दखल घेऊन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उच्छिल व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र उच्छिल या दोन्हीही ठिकाणी तसेच शालेय परिसरामध्ये सात कॅमेरे बसविण्यात आले. शासन निर्णयाला ग्रामपंचायतीच्या वतीने प्रतिसाद दिला आहे. (Junnar)
ज्यांच्या माध्यमातून हे सी.सी.टी.व्ही. सर्वत्र बसवण्यात आल्याबद्दल ग्रामपंचायतीच्या पेसा समितीच्या सदस्या व सरपंच मंदाताई सुनील बगाड व ग्रामकोष समितीचे सदस्य व शिक्षक-पालक संघाचे सदस्य नवनाथ बाळू केंगले.
उच्छिल गावचे पोलीस पाटील सुनील बबन बगाड यांच्या माध्यमातून हे काम करण्यात आले असून यासाठी विशेष सहकार्य ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच मंगेश आढारी, उपसरपंच मारुती खिलारी व ग्रामसेविका अश्विनी साबळे तसेच उच्छिलचे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांच्यासह शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन नवले उपाध्यक्ष सागर बगाड आणि पालक सदस्य अविनाश आढारी उपस्थित होते.
शालेय समिती व सर्व पालक वर्ग आणि सर्व शिक्षकवृंद उच्छिल या सर्वांच्या वतीने ग्रामपंचायत व ग्रामकोष समिती उच्छिल यांचे आभार मानण्यात आले.
हेही वाचा :
कंगना राणावतचे शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त विधान, भाजपने झटकले हात
गटप्रवर्तकांना चार हजारांची वाढ असमाधानी ; पुन्हा आंदोलनाची घोषणा
बार्टीच्या ७६३ पात्र विद्यार्थ्यांना १०० टक्के अधिछात्रवृत्ती
ब्रेकिंग : गटप्रवर्तकांच्या मानधनात चार हजार रुपयांची वाढ
Indian Army : भारतीय सैन्य दल अंतर्गत भरती; पात्रता 10वी
मोठी बातमी : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना
मोठी बातमी : कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर ; केंद्र सरकारकडून युनिफाइड पेन्शन योजनेला मंजूरी