Tuesday, May 21, 2024
Homeग्रामीणजुन्नर : वन खात्याचा अधिकारी लाच घेताना जाळ्यात लाचलुतपत विभागाची कारवाई

जुन्नर : वन खात्याचा अधिकारी लाच घेताना जाळ्यात लाचलुतपत विभागाची कारवाई


आळेफाटा
 : वन खात्याचा अधिकारी आळेफाटा येथे चाळीस हजाराची लाच घेतांना अहमदनगर लाचलुतपत विभागान रंगेहाथ पकडला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आळेफाटा येथील तक्रारदार यांच्या मावसभावाची संगमनेर तालुक्यातील डोळासने या ठिकाणी जमीन असून ही जमीन पूर्वी वनखात्याच्या कार्यक्षेत्रात होती. शेतजमीन ही निर्वाणीकरण झाले असले बाबतचा अभिप्राय देऊन जिल्हाधिकारी अहमदनगर यांना अहवाल पाठविण्यासाठी विशाल किसन बोराडे या वनअधिकाऱ्याने तक्रारदार यांचेकडे चाळीस हजार रुपयांची मागणी केली होती. नंतर मागणी वाढत असल्याने तक्रारदार आळे गावचे उपसरपंच विजय भिका कुऱ्हाडे यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.

बोराडे यांनी पुणे जाणार असल्याचे सागंत आळेफाटा येथे पैसे देण्यास सांगितले. लाचलुतपत विभागाचे पोलिस अधिकारी आणि पोलिस कर्मचारी आळेफाटा येथे दाखल झाले. संगमनेरला जाऊन खात्री झाली. आळेफाटा येथे आल्यानंतर पैसे स्वीकारले, पंचनामा करून आरोपी विशाल किसन बोऱ्हाडे याला अटक केली, आणि संगमनेर येथे नेऊन गुन्हा दाखल केला.

 

या कारवाईत लाचलुतपत प्रतिबंधक नाशिक परिक्षेत्राचे पोलिस अधिक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधिक्षक निलेश सोनवणे, पोलिस उपअधिक्षक सतीश भांमरे, साफळा अधिकारी पोलिस उपअधिक्षक शाम पवरे, साफळा पथक पोलिस नाईक विजय गुंगल, पोलिस अंमलदार रविंद्र निमसे आणि चालक पोलिस हवालदार हरूण शेख या पथकाने कारवाई केली.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय