Tuesday, May 21, 2024
Homeजिल्हाज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ.महेंद्र सिंग यांचे दुःखद निधन

ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ.महेंद्र सिंग यांचे दुःखद निधन

मुंबई : महाराष्ट्रातील ज्येष्ठ कम्युनिस्ट कामगार नेते, सिटूचे पुढारी कॉ. महेंद्र सिंग यांचे आज (४ जुलै) रोजी सकाळी मालाड येथील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. ते ७७ वर्षाचे होते.

कॉ. महेंद्र सिंग हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केंद्रीय कमिटी सदस्य होते. सिटूचे पुढारी म्हणून त्यांनी मुंबईत समर्थपणे कम्युनिस्ट व कामगार लढ्यांचे नेतृत्व केले. तसेच डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय)चे ते महाराष्ट्र राज्याचे संस्थापक सचिव होते. त्यांनी तरुण वयात युवक विद्यार्थी यांच्या शैक्षणिक समस्यांवर अनेक आंदोलने करून तुरुंगवास भोगला होता.

१९८० ते १९९० या काळात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात, तालुक्यात त्यांनी विद्यार्थी आणि युवक नेते तयार केले. शिक्षण आणि रोजगार हा मूलभूत अधिकार असावा आणि त्यासाठी कायदेशीर हक्क मिळावेत, मुलींना मोफत शिक्षण ग्रामीण भागात शिक्षणाचे सार्वत्रिकरण व्हावे, आणि इतर अनेक मागण्यांसाठी युवकांची सनद त्यांनी तयार करून त्याचे सादरीकरण शासकीय पातळीवर केले होते.

त्यांच्या अवेळी दुःखद निधनाने मुंबई आणि महाराष्ट्रातील कम्युनिस्ट चळवळीत खूप मोठी उणीव निर्माण झाली असल्याची भावना व्यक्त केली जाते आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय