Sunday, May 19, 2024
Homeग्रामीणशेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात युरिया खत उपलब्ध करून द्या - माजी आमदार जे.पी...

शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात युरिया खत उपलब्ध करून द्या – माजी आमदार जे.पी गावित

कळवण (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात युरिया उपलब्ध करून द्या, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार जे.पी.गावीत यांनी आज तहसीलदार आणि कृषी अधिकारी यांच्यासमवेत चर्चा करून निवेदन केली आहे.

माजी आमदार जे.पी.गावित म्हणाले की, “महाराष्ट्र शासनाने  शेतकऱ्याच्या बांधावर खते व बियाणे वाटप कार्यक्रम जाहिर केला आहे. हा कार्यक्रम कळवण तालुक्यात झालाच नाही. परंतु शेतकऱ्यांना युरिया दुकानावर मिळत नाही. इतर खतांची सुध्दा वाढीव दराने विक्री केली जात असल्याचे सांगितले. शेतीचा मुख्य हंगाम आहे. खते वेळेवर मिळणे गरजेचे आहे.”

यावेळी तहसीलदार आणि कृषी अधिकारी यांच्यासमवेत चर्चा करून केले. यावर शेतकऱ्यांना मुळ किंमती आणि मुबलक प्रमाणात खते उपलब्ध करू दिली जातील, असे आश्वासन देण्यात आले असल्याचे जी.पी.गावीत म्हणाले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय