Friday, April 26, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडज्येष्ठ पत्रकार विजय भोसले यांचे निधन 

ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले यांचे निधन 

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील दै. केसरीचे सर्वात जेष्ठ पत्रकार,राजकीय स्तंभलेखक विजय भोसले (वय ६५) आजाराने आज सकाळी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. दोनच दिवसांपूरर्वी भोसरी येथील एका खासगी हॉस्पिटलचे उद्घाटन कार्यक्रमात त्यांना भोवळ आली म्हणून वायसीएम मध्ये दाखल केले होते.

मूळचे सातारा जिल्ह्यातील औंध येथील रहिवासी असलेले भोसले हे गेली ४० वर्षे पत्रकारितेच्या निमित्ताने पिंपरी चिंचवडमध्ये स्थायिक झाले होते. अत्यंत अभ्यासपूर्ण, आक्रमक, मुद्देसूद लिखाण शैली असल्याने त्यांची राजकारणात एक जरब होती.

शहरात नगरपालिकेच्या स्थापनेपासून सर्व घडामोडींचे ते साक्षिदार होते. महापालिकेतील अनेक भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा त्यांनी पर्दाफाश केला होता. मंत्री, खासदार, आमदार आणि आजवरचे सर्व महापौर, नगरसवेकांमध्ये एक स्वतंत्र निर्भीड बाण्याचे, हाडाचे पत्रकार अशी त्यांची ओळख अखेर पर्यंत कायम होती. 

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय