Sunday, May 19, 2024
Homeग्रामीणखळवट लिमगावात जिजाऊ जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा; हजारो महिलांची हजेरी

खळवट लिमगावात जिजाऊ जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा; हजारो महिलांची हजेरी


वडवणी (बीड) : झी टॉकीजच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले वडवणी तालुक्याचे भूमिपुत्र सुसेन महाराज नाईकवाडे यांच्या पुढाकारातून आणि लढा दुष्काळाशी फाउंडेशनचे अध्यक्ष ऍड. राज पाटील यांच्या प्रेरणेने सुरु असलेला जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यातील दुसरा दिवस खळवट लिमगाव येथे पार पडला.

उसरा येथेही वृक्षारोपण जन्मोत्सव सोहळ्याचा तिसरा दिवस रविवारी पुसरा येथे पार पडला यावेळी गावातील कार्यकर्ते राहुल चिंचकर, सचिन नाईकवाडे, महादेव नाईकवाडे, मुजमुले यांनी योग्य नियोजन केले होते. यावेळी शिवव्याख्याते सुशेन महाराज नाईकवाडे, अक्षय देशमुख, गणेश घायतिडक, कृष्ण शेंडगे यांनी आपले विचार मांडले गावात वृक्षारोपण करण्यात आले.

या गावातील सुमारे ४० जिजाऊंच्या लेकींनी आपल्या भाषणातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. जिजाऊंच्या लेकींंनी उपस्थित हजारो महिला पुरुषांच्या अंगावर अक्षरशः शहारे उभे राहिले होते. खळवट लिमगाव येथील तरुण कार्यकर्ते जगदीश फरताडे, बालाजी गवळी, डॉ. सावळाराम उबाळे, गोकुळ उबाळे, आकाश मकासरे, जगदीश शिंदे, वसंत घाटुळ, श्रीरंग आंबुरे, महेश अंबुरे, दयानंद मोरे आदी तरुणांनी पुढाकार घेऊन याचे नियोजन केले होते. 

यावेळी जान्हवी भागवत अंबुरे, अमृता डिगंबर डुकरे, श्रद्धा श्रीरंग आंबुरे या मुलींनी लहान गटात तर मोठ्या गटात स्नेहल विठ्ठल खडके, आरती दिगंबर डुकरे, कार्तिक पांडुरंग काळे या शालेय विद्यार्थ्यांनी  प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. त्यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. प्रमुख वक्ते म्हणून ख्यातनाम शिवचरित्रकार सुसेन महाराज नाईकवाडे व ज्ञानेश्वर सोळंके यांनी प्रभावी मार्गदर्शन केले. यावेळी पत्रकार अशोक निपटे यांनी या जिजाऊ जन्मोत्सवाची रूपरेषा मांडली.

या कार्यक्रमासाठी लढा दुष्काळाशी फाउंडेशनचे अध्यक्ष ऍड. राज पाटील, ओम पुरी, हरीश बादाडे, संकेत लंगडे, बालाजी गवळी, लक्ष्मण बहीरवाल बद्रीनारायण बादाडे यांचीही उपस्थिती होती. तत्पूर्वी गावात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय