Thursday, August 11, 2022
Homeजिल्हा3 ऑगस्ट : पुणे जिल्हा सुरक्षा रक्षकांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन

3 ऑगस्ट : पुणे जिल्हा सुरक्षा रक्षकांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन

spot_imgspot_imgspot_imgspot_img

पुणे : पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ या मंडळात किमान २८०० नोंदीत सुरक्षा रक्षक विविध आस्थापनामध्ये काम करत आहेत.

महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक ( नोकरीचे नियमन आणि कल्याण) अधिनियम १९८१ त्याअंतर्गत योजना २००२ व २००५ ही सुरक्षा रक्षकांच्या नोकरीचे, सेवाशर्तीचे तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण करते.

परंतु बार्टी पुणे येथील आस्थापनेने सुरक्षा रक्षकांच्या बदल्या करण्यासाठी सुरक्षा रक्षक मंडळाला कळविले असुन मंडळाचे अध्यक्ष यांनी कुठलीच चौकशी न करता बदल्यांची कारवाई चालु केली आहे. अस्थापनेत २ ते ४ वर्ष झालेल्या सुरक्षा रक्षकांच्या बदल्या मंडळ कोणत्या कायद्यानुसार करत आहे. आज अस्थापनेत ४५ ते ५६ वर्ष वय झालेले सुरक्षा रक्षक काम करत आहेत त्यांच्या बदल्या केल्या आणि तर दुसरी आस्थापना त्यांना स्वीकारेल का ? असा सवालही सुरक्षा रक्षक करत आहेत.

मंडळाचे बदल्यांबाबत ४५ ते ५५ वर्ष वय झालेल्या सुरक्षा रक्षकांनसाठी कोणती मार्गदर्शक तत्वे आहेत. फक्त बदल्या करायच्या आणि सुरक्षा रक्षकांना बेरोजगार करायचे. त्यामुळे सुरक्षा रक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत आणि ही लढाई एकट्या महासंघाची नसुन सर्व सुरक्षा रक्षकांची आहे, असेही सुरक्षा रक्षकांनी मंडळाकडे मांडले आहे.

सुरक्षा रक्षक मंडळ स्थापन होऊन १६ वर्षे उलटून गेली, सुरक्षा रक्षकांना भविष्य निर्वाह निधी वरील योजनांचा लाभ मिळत नाही. वेतनातून ESIC चे अंशदान कपात करतात पण भरले जात नाहीत. उपदान प्रदान अधिनियम १९७२ मधील विमा लागु केला नाही. कामगार कल्याण मंडळाच्या योजनांचा लाभ मिळत नाही. इतक्या दयनीय अवस्थेमध्ये सुरक्षा रक्षक जगत आहे. सुरक्षा रक्षकांना राष्ट्रीय सुट्टया चे पगार अतिकलिक दराने मिळत नाही. त्या दिवशी सुट्टी घेतली तर त्या दिवसाचा पगार मिळत नाही. सुरक्षा रक्षक हा भारतीय रहिवासी आहे त्याला तो लाभ मिळालाच पाहिजे. तसेच वार्षिक भरपगारी रजा १५.५, रुग्णात रजा ३०, नैमित्तिक सुट्टया ८,राष्ट्रीय सुट्टया ८ मिळाल्या पाहिजे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन आणि कल्याण) (सुधारित) योजना २००५ ची अमलबजावणी केली नसल्याने मंडळामध्ये सुरक्षा रक्षकांची भरती केल्याने प्रतीक्षा यादी वाढत आहे. २००५ च्या योजने नुसार प्रमुख मालक स्वतः ची व ठेवलेल्या खाजगी सुरक्षा रक्षकांची नोंदणी मंडळाने विहित केलेल्या फॉर्म नोंदणी घेऊन सुरक्षा रक्षक आहे, त्याच ठिकाणी कार्यरत राहतो. मग बदली कशी केली जाते, असा सवालही केला जात आहे.

म्हणुन सुरक्षा रक्षकांच्या बेकायदेशीर होणाऱ्या बदल्या व इतर प्रलंबित समस्यांना वाचा फोडण्यासाठी दि. ३ ऑगस्ट २०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे याठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती भारतीय मजदूर संघाचे विशाल मोहीते, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघचे पुणे जिल्हा प्रमुख किरण पवार, जिल्हा अध्यक्ष अविनाश मुंढे यांनी दिली आहे.


व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय