Wednesday, August 10, 2022
Homeजिल्हाछत्रपती संभाजीराजेंना दिलेले आश्वासन महाराष्ट्र सरकारने पाळावे - सकल मराठा समाज

छत्रपती संभाजीराजेंना दिलेले आश्वासन महाराष्ट्र सरकारने पाळावे – सकल मराठा समाज

spot_imgspot_imgspot_imgspot_img

कोल्हापूर छत्रपती संभाजीराजेंना दिलेले आश्वासन महाराष्ट्र सरकारने पाळावे, अशी मागणी सकल मराठा समाज कोल्हापूर च्या वतीने करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाजाला द्यायच्या आरक्षणाबरोबर इतर काही महत्वाच्या

मागण्या सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आल्या होत्या. या संदर्भात खासदार छत्रपती संभाजीराजेंनी मराठा समाज समन्वयकांच्या उपस्थित दि.१६ जून रोजी राजर्षी छ. शाहू महाराज समाधी स्थळावर मुक आंदोलन केले होते. त्यावेळी राज्य शासनाच्या वतीने खासदार छत्रपती संभाजीराजे यांना बैठकीस बोलवून सर्व मागण्या मार्गस्थ करण्याचे ठोस आश्वासन दिले होते. त्यापैकी मराठा समाजातील २१८५ एम.पी.एस.सी. उत्तीर्ण विद्याध्यांना दि.३१ जुलै पूर्वी नियुक्ती करण्याचे जाहीर आश्वासन महाराष्ट्र शासनाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खा.छत्रपती संभाजीराजे यांना दिले होते.

पण आज ३१ जुलै तारीख उलटून गेली तरीही नियुक्त्या दिलेल्या नाहीत. म्हणजेच राज्य सरकार सकल मराठा खासदार छत्रपती संभाजीराजे यांची फसवणूक करून विश्वासघात करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

दिलेले आश्वासन पाळून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. विद्यार्थ्यांचा अंत पाहू नये अन्यथा आपली फसवणूक होते. म्हणून कै.स्वप्निल लोणकर या विद्याथ्यांने आपल्या जीवनाचे बरे वाईट केले त्याची पुनरावृत्ती टाळावी. अन्यथा नाईलाजाने शासनाने खासदार छत्रपती संभाजीराजेंना दिलेला शब्द न पाळता फसवणूक केली म्हणून दि.९ ऑगस्ट पासून छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण मागणीसाठी आंदोलनासाठी सकल मराठा समाज सज्ज असल्याचा इशारा दिला आहे.

निवेदनावर माराठ समाज संघटकचे बाळ घाडगे, अ भा या युवा संघटनाचे राजू सावंत, संभाजी ब्रिगेडचे बाळासाहेब पाटील, हणमंत पाटील, अजित सासणे, प्रमोव पुंगावकर,अनिल घाडगे, मराठा समाज सेवा संघटनाचंद्रकांत पाटील, राजमाता जिजाऊ ब्रिगेड सुनिता पाटील, मराठा शौर्यपीठ प्रसाद जाधव, लोकसेवा राजर्षि शाहू

प्रतिष्ठान चे पै.बाबा महाडीक, अँड.रणजित गावडे, दादासाहेब लाड, रमेश पोवार, महेश बा. जाधव आदींची नावे आहेत.


व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय