Thursday, May 2, 2024
Homeजिल्हायुद्धात मनुष्यच नाही तर देश बेचिराख होतील - व्यंकटेश कोंगारी

युद्धात मनुष्यच नाही तर देश बेचिराख होतील – व्यंकटेश कोंगारी

सिटू कडून जागतिक शांतता दिवस साजरा

सोलापूर
: आज जागतिक स्तरावर शांतता अबाधित राखणे काळाची गरज बनली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर युद्धाचे दुरगामी परिणाम भोगावे लागले. साधारणपणे अडीच कोटी माणसे या युद्धात दगावले. मोठ्या प्रमाणात जीवितहानी व वित्त हानी झाली. शांतता व सुव्यवस्था भंग पावली. लोक हतबल झाले, बेघर आणि बेरोजगार झाले यांचे पुनर्वसन करण्यासाठी देशात पराभूत झालेल्या वर्षानुवर्षे लागली आहेत. अर्थातच युद्धात मनुष्यच नव्हे तर देश बेचिराख होतील. याकरीता आज जागतिक शांतता टिकवण्याची जबाबदारी प्रत्येक व्यक्तीची आहे असे प्रतिपादन माजी नगरसेवक कॉ.व्यंकटेश कोंगारी यांनी केले.

सेंटर ऑफ इंडियन ट्रेंड युनियन्स सोलापूर जिल्ह्या समितीच्या वतीने गुरुवार 1 सप्टेंबर रोजी दत्त नगर कार्यालय येथे सिटू च्या नेत्या माजी नगरसेविका नसीमा शेख यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक शांतता दिवसाचे औचित्य साधून परिसंवाद पार पडले.

कोंगारी बोलताना पुढे म्हणाले की, रशिया आणि युक्रेन चे युद्ध हे साम्राज्यावादी देशांनी ज्या पद्धतीने हस्तक्षेप करत आहेत हे जगाने पाहिले आहे. दोन देशात जर युध्द परिस्थिती निर्माण झाली तर ते आपसांत तणाव न वाढवता शांततेत आंतरराष्ट्रीय शांतता परिषदेत सल्लामसलत करून प्रश्न मार्गी लावले पाहिजे अशी भूमिका सिटू ची आहे. साम्राज्यावादी देशाचा बुरखा पाडणे हे जगापुढील आव्हान असून त्याला गाडणे हेच कायमचे उपाय आहे.

प्रास्तविक अनिल वासम यांनी केले. यावेळी किसान सभेचे नेते कॉ.सिध्दप्पा कलशेट्टी, सलीम मुल्ला यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर रंगप्पा मरेड्डी, शेवंता देशमुख, अनिल वासम आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कॉ.दत्ता चव्हाण यांनी केले.

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय