Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपिंपळे गुरव येथील गणेश उत्सव मंडळासमोर डेंग्यूबाबत जनजागृती करून प्लास्टिकमुक्तची शपथ

पिंपळे गुरव येथील गणेश उत्सव मंडळासमोर डेंग्यूबाबत जनजागृती करून प्लास्टिकमुक्तची शपथ

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने सांगवी, पिंपळे गुरव परीसरात डेंग्यू आजाराबाबत गणेश मंडळाच्या आरतीच्या वेळी संध्याकाळी सात ते नऊ वेळात दररोज तीन मंडळामध्ये स्पीकर द्वारे, माहितीपत्रक वाटून डेंग्यू आजाराची जनजागृती करण्यात आली. डेंग्यू आजार होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी आणि झाल्यावर त्यावरील उपाय योजनांची माहिती स्वतः शहराध्यक्ष आण्णा जोगदंड हे स्पीकरमधून गणेश भक्तांना देत होते. ही जनजागृती सहा दिवसापर्यंत चालणार असल्याचे जोगदंड यांनी सांगितले. सध्या पिंपरी चिंचवड मध्ये 125 डेंग्यू आजाराचे रूग्ण असून आयुक्त यांनी केलेल्या आव्हानास प्रतिसाद देत जनजागृती करत असल्याचे जोगदंड यांनी सांगितले. In front of the Ganesh Utsav Mandal at Pimple Gurav, taking a plastic-free oath by creating awareness about dengue

डेंगू आजार म्हणजे डंक छोटा, धोका मोठा, त्यामुळे हिवताप, डोकेदुखी, अंगावर लालसर रंग येणे,तीव्र पाठ दुखी,पुरळ उठणे असे लक्षणे दिसून आल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आव्हान करण्यात आले. पालीकेचे ह प्रभागाच्या आरोग्य निरीक्षक धनश्री जगदाळे यांनी डेंग्यू आजाराची  मंडळासमोर माहिती देऊन उपाययोजना हि सागितल्या तसेच आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन हि त्यांनी केले. 

नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवणे तसेच पाणी न साठण्याची खबरदारी घ्यावी, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस साजरा करावा असा सल्ला यावेळी देण्यात आला. प्लास्टिक मुक्तीची शपथ उपस्थित गणेश भक्तांना जोगदंड देत आहेत.

या जनजागृती मोहीमेत शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, महीला अध्यक्षा मिना करंजावणे, मुरलीधर दळवी, गजानन धाराशिवकर, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगिता जोगदंड, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या  ह प्रभागाच्या आरोग्य निरीक्षक धनश्री जगदाळे, महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष मनिष भापकर, उपाध्यक्ष दिपक गायकवाड, कार्याध्यक्ष विनायक गारवे, खजिनदार विजय साळुंखे, सा.का सुरेश सकट, सत्ता प्रतिष्टान अध्यक्ष सौरभ शिंदे, राम डुकरे, लिना रानडे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय