Tuesday, May 21, 2024
Homeजिल्हालैंगिक शोषण करणारे खासदार ब्रिजभूषण सिंग व संदीप सिंग यांना तात्काळ अटक...

लैंगिक शोषण करणारे खासदार ब्रिजभूषण सिंग व संदीप सिंग यांना तात्काळ अटक करून कायदेशीर कारवाई करा; अन्यथा राज्यव्यापी आंदोलन

सोलापूर : सेंटर ऑफ इंडियन्स (सिटू), अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, अखिल भारतीय किसान सभा, डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया, स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने संयुक्त निवेदन देण्यात आले असून भारतीय महिला कुस्तीपटू खेळाडूंचे लैंगिक शोषण करणाऱ्या खासदार ब्रिजभूषण सिंग व संदीप सिंग यांना तात्काळ अटक करून कायदेशीर कारवाई करा, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडणार अशी भूमिका माजी नगरसेविका नसीमा शेख यांनी मांडले. 

आज (दि.19) सेंटर ऑफ इंडियन्स (सिटू), अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, अखिल भारतीय किसान सभा, डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया, स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने  महिला संघटनेच्या राज्याध्यक्ष नसीमा शेख यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांना शिष्टमंडळाच्या द्वारा संयुक्त निवेदन देण्यात आले.

यावेळी शिष्टमंडळात शेवंता देशमुख, शकुंतला पानिभाते, सुनंदा बल्ला, लिंगवा सोलापूरे,युवा आघाडीचे राज्य सचिव दत्ता चव्हाण, जिल्हा सचिव अँड.अनिल वासम, विजय हरसुरे, सनी कोंडा, शाम आडम, विद्यार्थी आघाडीचे मल्लेशम कारमपुरी आदींसह महिला युवा कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती.

या निवेदनात म्हटले आहे की, विविध आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये भारताचा गौरव वाढवणारे देशातील कुस्तीपटू खेळाडू जंतरमंतर येथे दि. २३ एप्रिल २०२३ पासून निदर्शने करत आहेत. एका अल्पवयीन महिला कुस्तीगीरासह अनेक महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण करणारे WFI चे अध्यक्ष आणि भाजपचे लोकसभा खासदार ब्रिजभूषण चरण सिंग यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या विषयाची पाहणी करण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल असे आश्वासन मिळाल्याने कुस्तीपटुंनी आंदोलन थांबवले होते. परंतु कुस्तीपटूंना न्याय देण्यात समिती अपयशी ठरल्याने आता ते आपल्या सहकाऱ्यांना न्याय देण्याची मागणी करत जंतरमंतरवर परतले आहेत. मागील २६ दिवसापासून हे आंदोलन सुरु आहे. दिल्ली पोलिसांनी तक्रार गांभीर्याने घेतली नाही आणि आजपर्यंत या संदर्भात एफआयआर दाखल केलेली नाही हे धक्कादायक आहे. कुस्तीपटूंना अखेर आपल्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जावे लागले.

केंद्र सरकार विविध यंत्रणांचा वापर करून अत्याचार करणाऱ्या ब्रिजभूषणला संरक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे. देशाचे नाव उंचावणाऱ्या पैलवानांवर सरकारकडून अशाप्रकारे अत्याचार होत आहेत, हे दुर्दैवी आणि खेदजनक आहे. याबाबत भाजप आणि संपूर्ण सरकारला जबाबदार धरले पाहिजे. या समस्येवर केंद्र सरकार ज्या पद्धतीने हाताळणी करत आहे त्याचा तीव्र निषेध करते आणि या प्रकरणाची निःपक्षपाती चौकशी करून संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे न्यायाचे व अत्यंत जरुरीचे आहे, असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

मागण्या खालीलप्रमाणे :

1. भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंग यांना त्वरित अटक करा आणि त्यांचे सर्व राजकीय व सरकारी पदभार काढून घ्या.

2. हरियाणातील भाजपा सरकारचे मंत्री संदीप सिंग यांचे मंत्रीपद रद्द करून त्यांना अटक करा.

3. आंदोलक महिला कुस्तीगीरांना संरक्षण द्या.

4. कायद्याच्या अखत्यारित न्याय आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि वेळेच्या मर्यादेत चौकशी करून आरोपपत्र दाखल करा.

5. आंदोलक कुस्तीगीर व पत्रकारांविरुद्ध बळाचा वापर करणारे पोलिस अधिकारी आणि संबंधित पोलिस उपायुक्तांवर कारवाई करा.

6. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हा नागरिकांचा अधिकार आहे, या अधिकाराचा आदर करा. म्हणजे आत्ताच्या संदर्भात, दिल्लीतील निषेध सभेच्या जागी वीजपुरवठा सुरू करा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा आणि आंदोलनात सहभागी होणाऱ्या सर्वांना संरक्षण द्या.

7. सर्व आरोपांचा तपास सर्वोच्च अथवा उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली करा.

1 जूनला कॉ.नरसय्या आडम मास्तर यांचा आत्मचरित्र प्रकाशन सोहळा !

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी

NDA & NA : राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी अंतर्गत बंपर भरतीची घोषणा; 12वी उत्तीर्णांसाठी मोठी संधी…

मुंबई येथे एअर इंडिया एअर सर्विसेस लि. अंतर्गत 480 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

आरोग्य संचालनालय मुंबई अंतर्गत 6000+ जागांसाठी मेगा भरती, आजच करा अर्ज 

भारतीय नौदलात 372 पदांची भरती; पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय