Sunday, May 19, 2024
Homeजिल्हाविविध क्षेत्रातील महिलांचा दिव्यदृष्टी फाऊंडेशनच्या वतीने गौरव

विविध क्षेत्रातील महिलांचा दिव्यदृष्टी फाऊंडेशनच्या वतीने गौरव

नाशिक : जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने दिव्यदृष्टी फाऊंडेशन आयोजित विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या डॉ अनिता घाडगे, सोनाली पाठक, मयुरी शुक्ला, कांचन पवार, ऍड. मयुरी पी, माई गुचके आदी विविध क्षेत्रातील महिलांचा दिव्यदृष्टी फाऊंडेशनच्या संस्थापिका कल्पना खरात यांनी “ती” चा गौरव सर्वांची जबाबदारी म्हणून सन्मानित केले. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी डॉ.अनिता घाडगे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीमाईंच्या प्रतिमेला प्रमुख अतिथी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर वेशभुषा सादरीकरणाचा कार्यक्रम झाला, यात सहभागी स्त्रियांनी रमाबाई आंबेडकर, सावित्रीबाई फुले, भारतीय संस्कृती, पदामावती, हिरकणी, इंदिरा गांधी यांच्या भूमिका साकारल्या होत्या. डॉ अनिता घाडगे यांनी स्त्रियांच्या आरोग्य समस्यांची माहिती सांगितली. तसेच सोनाली पाठक यांनी एक स्त्री जबाबदाऱ्या मध्ये जखडून आहे, तिने स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे असे प्रतिपादन केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय