Tuesday, April 16, 2024
Homeजुन्नरमहाराष्ट्र राज्य खादी ग्रामोघ्योग पुणे व श्री राधेश्याम दिव्यांग संस्था यांच्या संयुक्त...

महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोघ्योग पुणे व श्री राधेश्याम दिव्यांग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम मेळावा संपन्न

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील सुक्षिशित बेरोजगार व दिव्यांग बचत गट, महिला बचत गट यांना स्वयंरोजगार सुरू करण्याकरीता महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोघ्योग पुणे व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केंद्र महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी श्री कालिका माता मंगल कार्यालय कासार आळी जुन्नर येथे पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम जनजागृती मेळावा संपन्न झाला.

ग्रामीण व शहरी भागातील सुक्षशित बेरोजगारांना स्वयंरोजगार सुरू करण्या करीता पुणे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी अमर राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. महामंडळाकडून मिळणारे कर्ज प्रकरण व बँकेकडून मिळणारे कर्ज याचे मार्गदर्शन जेष्ठ सहाय्यक ऐ.ऐ.कदम यांनी केले. तसे विविध नवीन व्यवसायची सुरूवात कशी करावी यांची माहिती व मार्केटिंग बद्दल माहिती तसेच खनिज संपत्तीवर आधारित उद्योग, कृषी व अन्न प्रक्रिया उद्योग, पाॅलीमर व रसायनावर आधारित उद्योग, वस्त्रोद्योग, सेवा उद्योग, वन संपत्ती वर आधारित उद्योग, ग्रामीण अभियांत्रिकी तसेच अपारंपारिक उर्जेवर आधारित उद्योग माहिती व कारागिर, बचत गट, संस्था या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत याची सविस्तर माहिती देण्यात आली

दरम्यान, स्क्रीनवर माहिती स्वयंरोजगार सुरू केलेल्या उद्योगांची माहिती दाखवण्यात आली. यावेळी जुन्नर तालुक्यातील महिला बचत गट, दिव्यांग बचत गट व सुशिक्षित बेरोजगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी 273 नवीन कर्ज प्रकरणा करीता नाव नोदणी झाली असून मध प्रशिक्षणा करीता 34 जणांनी नाव नोदणी केली आहे.

यावेळी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व लेण्याद्री गणपती देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई यांनी उपस्थित बेरोजगारांना, महिला व दिव्यांग बचत गटांना स्वयंरोजगार सुरू करावे. जुन्नर तालुका पर्यटन स्थळ म्हणून प्रसिध्द आहे, युवक युवतींनी नोकरीच्या मागे न लागता स्वतः चा स्वयंरोजगार सुरू करून बेरोजगारांना रोजगार द्यावा असे मार्गदर्शन त्यांनी केले. तनिष्का ग्रूप जुन्नरच्या महिला अध्यक्षा उज्ज्वला शेवाळे यांनी. स्वयंरोजगार उद्योग सुरू करून बेरोजगारांना रोजगार द्या म्हणून मार्गदर्शन केले. तसेच तनिष्का ग्रूपच्या वतीने नफिसा इनामदार यांना समाजातील केलेल्या कामाबद्दल प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.

जुन्नर तालुक्यातील खादी ग्रामोद्योगचे अध्यक्ष जालिंदर ताजणे, सचिव व्ही एन बोडरे यांनी बँक कर्ज प्रकरणाबाबत माहिती दिली व 5% ते10% स्वतः चे भांडवल व 35% महामंडळ व बँकेकडून 60% कर्ज पुरवठा दिला जात असून महामंडळाकडून 35% सबसिडी तसेच विशेष घटकातील लोकांना 10 हजार ते 50 हजार रूपये सबसिडी दिली जात आहे, तरी स्वयंरोजगार सुरू करण्यास इच्छुकांनी ऑनलाईन कर्ज प्रकरण करीता नाव नोदणी करून घ्यावी म्हणून आवाहन त्यांनी केले.

श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केंद्र महाराष्ट्र राज्य ग्रूपचे संस्थापक अध्यक्ष यांनी बँकेत प्रकरण मंजूरकरीता येणाऱ्या अडचणी व महिला बचत गट, दिव्यांग बचत गट लोकांनी तयार केलेल्या साहित्याची मार्केटिंग करीता संस्था स्वतः खरेदी करून उत्पादन केलेला माल मार्केटिंग करणार असुन सर्व महिला बचत गट व दिव्यांग बचत, दिव्यांग लोकांनी स्वयंरोजगार सुरू करून बेरोजगारांना रोजगार द्यावा असे आवाहन दिपक चव्हाण यांनी केले.

यावेळी महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग पुणेचे ऐ.ऐ. कदम, जेष्ठ सहाय्यक रवींद्र शेवते, ऑडीटर निवास घोलप, सचिव हावेल, श्रीकांत शहा, डिसेंट फाउंडेशन व लेण्याद्री गणपती देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र बिडवई, खादी ग्रामोद्योग जुन्नर तालुका अध्यक्ष जालिंदर ताजणे, श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केंद्र महाराष्ट्र राज्य ग्रूपचे संस्थापक अध्यक्ष दिपक चव्हाण, अध्यक्ष अरूण शेरकर, उपाध्यक्ष राहुल मुसळे, दशरथ साळवे, खादी ग्रामोद्योगचे सचिव व्ही, एन, बोडरे, मध पर्यावेशक प्रभाकर पलवे, जुन्नर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक अविनाश कर्डिले, वेल्फर कादरी फाउंडेशनचे अध्यक्ष रऊफ खान पठाण, तनिष्का ग्रूपच्या उज्ज्वला शेवाळे व तनिष्का ग्रूपच्या सर्व महीला पदाधिकारी, प्रहार बेघर महिला संघटनेच्या नफिसा इनामदार, महिला अध्यक्षा शमिम सय्यद, सचिव रजनी शहा सर्व महीला पदाधिकारी सदस्य नंदाताई खोमने, राज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत जाधव, श्रीहरी नायकोडी, केरभाऊ नायकोडी, सौरभ मातेले, सुनिल जंगम, अशोक घोटणे, जालिंदर ढोमसे, पत्रकार उपस्थित होते.

यावेळी संस्थेचे अरूण शेरकर अध्यक्ष यांनी दर गुरुवारी खादी ग्रामोद्योगचे कार्यालय सुरू असते तसेच अधिक माहितीसाठी श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केंद्र महाराष्ट्र राज्य ग्रूप पणसुंबा पेठ जुन्नर येथे संपर्क करावा असे आवाहन केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय