Friday, November 15, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त सुरेश खाटोकार यांचा सन्मान

PCMC : वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त सुरेश खाटोकार यांचा सन्मान

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त निगडी येथे सुमारे ३० वर्षापासून वृत्तपत्र विक्री करत, सामाजिक क्षेत्रात काम करणारे वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय अगदी आवड व छंद म्हणून करणारे सुरेश व्यंकादास खाटोकार यांचा आज कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी इरफानभाई चौधरी, सामाजिक कार्यकर्ते हौसराव शिंदे, फरीद शेख, सुषेन खरात, अंबालाल सुखवाल, आबा शेलार, नितीन भराटे, मनोज यादव, ओमप्रकाश मोरया, राजेश अगरवाल उपस्थित होते.

खटोकार यांनी वृत्तपत्र विक्रीचा व्यवसायाची सुरुवात फक्त ६५ रुपयात सुरू केला. त्याकाळी फक्त ५० पैसे १ रुपया अशा दरात वृत्तपत्र उपलब्ध होत असत. निगडी टिळक चौकाच्या बाजूला साध्या खाटेवर पेपर ठेवून विक्री करणारे खाटोकार हे येवला नाशिक येथील असून ३० वर्षांपूर्वी पिंपरी चिंचवड शहरांमध्ये आले काही दिवस खाजगी कंपनीमध्ये काम केले.कायमस्वरूपी काम न मिळाल्याने इतर व्यवसाय सुरू केले मात्र त्यात व्यवसायात मन रमले नाही म्हणून वृत्तपत्र विक्रीचा दररोज सकाळी पहाटे लवकर उठून हा व्यवसाय सुरू केला आणि या व्यवसायामध्ये ते यशस्वी झाले सर्व मुलांचे शिक्षण चांगल्या पद्धतीने करून त्यांनी एक समाजासमोर आदर्श निर्माण केलेला आहे.  

नखाते म्हणाले की पावसाळा, हिवाळा उन्हाळा कोणता ही ऋतू असो भल्या पहाटे उठून सायकलवर तर कोण चालत घरोघरी वर्तमानपत्र पोहोच करण्याचा नित्यक्रम पाळणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा १५ ऑक्टोबर हा सन्मान दिन. माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ‘वृत्तपत्र विक्रेता दिन’म्हणून साजरा केला जातो. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या दृष्टीने हा त्यांच्या कष्टाचा गौरव करणारा दिवस वृत्तपत्र विक्रेत्यासह असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू त्यांना समाजात सन्मान मिळावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

संबंधित लेख

लोकप्रिय