Monday, May 6, 2024
Homeग्रामीणहेरवाड व माणगाव ग्रामपंचायतींना अनिसचा सामाजिक प्रेरणा पुरस्कार जाहीर !

हेरवाड व माणगाव ग्रामपंचायतींना अनिसचा सामाजिक प्रेरणा पुरस्कार जाहीर !

कोल्हापूर : विधवा प्रथा निर्मूलनाच्या ठराव करणाऱ्या हेरवाड व माणगाव ग्रामपंचायतींना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सत्यशोधक केशवराव विचारे यांच्या स्मरणार्थ सामाजिक प्रेरणा पुरस्कार मंगळवारी जाहीर करण्यात आला आहे.

हेरवाड गावचा नवा आदर्श ; महाराष्ट्रात विधवा प्रथा बंद ,शासन निर्णयाचे सर्वत्र स्वागत !

कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड व माणगाव येथील ग्रामसभांनी विधवांची अवहेलना करणाऱ्या प्रथा बंद करण्याचा उठाव करणे ही प्रेरणादायी घटना आहे त्यामुळे या दोन ग्रामपंचायतींना प्रत्येकी 50 हजार रुपये हा पुरस्कार मिळणार आहे .

येत्या दोन दिवसांत राज्यात प्रामुख्याने ढगाळ हवामान !

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती च्या दिवशी म्हणजेच 31 मे रोजी हेरवाड व माणगाव येथे ग्रामस्थांच्या उपस्थितीत हे पुरस्कार वितरण समितीच्या राज्य अध्यक्ष सरोज एन पाटील, डॉक्टर शैला दाभोळकर यांच्या हस्ते व अभिनेत्री किरण माने यांच्या उपस्थितीत होणार आहे.

आज जागतिक मधमाशी दिन ; विशेष लेख !

 ही अभिनव कल्पना मांडणारे प्रमोद नारायण झिंजाडे यांचा विशेष सत्कार या निमित्ताने करण्यात येणार आहे. या कार्यक्रमावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा अध्यक्ष विलासराव पवार ,कार्याध्यक्ष बाळासाहेब मुल्ला हे उपस्थित राहणार आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय