Sushma Andhare : शिवसेना (ठाकरे गटाच्या) नेत्या सुषमा अंधारे यांच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेले हेलिकॉफ्टर क्रॅश झाल्याची माहिती आहे. महाड परिसरात ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती हाती येत आहे.
सध्या सर्वत्र लोकसभा निवडणूकांचा प्रचार जोरदार सुरू आहे. या निवडणूकींच्या प्रचारासाठी हेलिकॉफ्टरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. अशात शिवसेना (ठाकरे गटाच्या) नेत्या सुषमा अंधारे घेण्यासाठी आलेले हेलिकॉफ्टर रायगड मधील महाडमध्ये क्रॅश झाले. हेलिकॉफ्टर क्रॅश झाले त्यावेळी सुषमा अंधारे (Sushma Andhare) हेलिकॉफ्टर मध्ये नव्हत्या.
या हेलिकॉफ्टरचे पायलट सुखरूप असल्याची माहिती आहे. हेलिकॉप्टर क्रॅश होण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. महाडमध्ये ही घटना घडल्याची माहिती आहे. सुषमा अंधारेच्या बसण्यापूर्वीच हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले.
कोण आहेत Sushma Andhare ?
सुषमा अंधारे या आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत. शिवसेनेच्या फुटीनंतर सुषमा अंधारे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. शिवसेना ठाकरे गटाच्या 2022 च्या दसरा मेळाव्यात त्यांनी दमदार भाषण केले. तेव्हा पासून त्या चर्चेत आल्या. आपल्या आक्रमक भाषण शैलीसाठी त्या प्रसिद्ध आहे. सध्या त्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या स्टार प्रचारक आहेत.
हे ही वाचा :
मोठी बातमी : राहुल गांधींना या मतदार संघातून उमेदवारी जाहीर
‘हिंदू विधि झाले नसल्यास ते लग्न ग्राह्य धरले जाणार नाही’ सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
कोरोना लसीचे साईड इफेक्ट; लस प्रमाणपत्रावरून पंतप्रधान मोदींचा फोटो हटवला, चर्चेला उधान
‘अनुपमा’ फेम अभिनेत्री रुपाली गांगुली राजकारणात उतरली, ‘या’ पक्षात केला प्रवेश
ब्रेकिंग : मिमिक्री आर्टिस्ट श्याम रंगीला पंतप्रधान मोदींच्या विरोधात लढणार निवडणूक
निवडणूकीच्या अगोदर अरविंद केजरीवाल यांना अटक का ? सर्वोच्च न्यायालयाचे ईडीला ५ प्रश्न