Friday, April 26, 2024
Homeहवामानराज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

मुंबई, जुलै १० : राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. तर काही ठिकाणी अक्षरश:पावसाने थैमान घातले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळत आहे. ओडिशा आणि लगतच्या परिसरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रासह गुजरात तटपासून कर्नाटक तटापर्यंत होत असलेल्या हवामान बदलामुळे १२ जुलैपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाट भागात आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे. राज्यात पुढील पाच दिवस सक्रिय मान्सूनची स्थिती राहण्याची शक्यता आहे. पालघर, रायगड रत्नागिरीत अतिमुसळधार पावसाचा इशार देण्यात आला आहे. हवामान विभागाने 13 जुलै पर्यंत हा अलर्ट जारी केला आहे. यासह पुणे आणि साताऱ्यात अती मुसळधार पाऊसाची शक्यता आहे. तर धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, अहमदनगर, सांगली, मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ‘आयएमडी’ने वर्तवली आहे.

रेड अलर्ट
१० जुलै रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा
११ जुलै पालघर, रत्नागिरी, रायगड, पुणे आणि सातारा

ऑरेंज अलर्ट
१० ते १३ जुलै


मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा
दरम्यान, कोकणसह मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता असल्याने नदीकडील गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय